मनमाड मार्ग: सोशल मीडिया वर भाऊसाहेब येवले यांनी एक विडियो टाकली आहे. यात एक वृद्ध गृहस्थ शशिकांत माणिकराव धामणे आपली व्यथा मांडत आहेत. शिंगणे गावातील ते उप सरपंच आहेत. ते नगर मनमाड मार्गावर एका खड्ड्या समोर बसले आहेत. रोड वरील हा खड्डा आहे आणि त्या खड्ड्यात त्यांनी छोटे रोप लावले आहे. अंगावर काटा आणणारी घटना यात सांगितली गेली आहे. ऐन दिवाळीत त्यांनी आपला नातू या खड्ड्यात गमावला आहे.
रस्त्यावरून गाडीने जात असताना खड्ड्यात गाडी आदळल्यामुळे आईच्या हातातून मूल निसटले व मार लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या रस्त्यावरील खड्ड्यात त्यांनी आपल्या घरातील दोन व्यक्ति गमावले आहेत असे ते या विडियो मध्ये सांगत आहेत. विडियो मध्ये ते हात जोडून प्रशासनाला विनंती करत आहेत की, आम्हाला कर्जमाफी नको पण कमीतकमी आम्हाला प्राथमिक सुविधा तरी सरकारने द्याव्या अशी ते मागणी करत आहेत. आम्हाला सरकारकडून कोणतीही अपेक्षा नाही, सर्वसामान्य कुटुंबातील जनतेला सरकारकडून काही नकोय, फक्त सर्वसामान्य माणसावहया समस्या आणि ग्रामीण भागातील समस्या यांच्या कडे सरकारने लक्ष द्यावे आमच्या सोयी सुवूधयांकडे सरकारने लक्ष द्यावे एवढीच साधी अपेक्षा ते ठेवत आहेत.
जागतिक दर्जा वरील शिर्डी व शनि शिंगणापूर आणि नाशिक कडील नागरिक या मार्गावटून जात असतात. अश्या महत्वाच्या मार्गाची अशी अवस्था शासनाला का दिसत नाही. मतदान असताना राजकरणि लोक मतांसाठी लोकांना अपेक्षा दाखवतात आपल्या समस्यांचे निवारण होईल या सध्या अपेक्षेने यांना निवडून देतात त्याबदल्यात लोकांना अश्या घटनांना सामोरे जावे लागते.