वाडिया हॉस्पीटल बंद होऊ देणार नाही : शर्मिला ठाकरे

मुंबई: मुंबईतील वाडिया हॉस्पीटल बंद करण्याच्या वादात मनसेने उडी घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी वाडिया हॉस्पीटल बंद होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.
वाडिया रुग्णालातील कामगारांच्या आंदोलनात त्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी मनेसेचे नेते बाळा नांदगावकर देखील उपस्थित होते.
मागील आठवड्यापासून वाडिया हॉस्पीटलने रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार दिला आहे. वैद्यकीय सेवा देणाऱ्यांना देण्यासाठी पैसे नसल्याचे हॉस्पिटलने स्पष्ट केले होते. महापालिका अनुदानाची थकबाकी देत नसल्याने हॉस्पीटल बंद करावे लागणार असल्याचे वाडिया प्रशासन आणि पालिकेने परस्परविरोधी दावे केले आहेत.

यावेळी ठाकरे म्हणाल्या, वाडिया हॉस्पीटल बंद झाले तर गोरगरीबांनी उपचारासाठी जायचे कुठे? महापालिका आणि संबंधित मंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन यावर तोडगा काढावा. काहीही झाले तरी हे हॉस्पीटल आम्ही बंद होऊ देणार नाही.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा