शुल्क संदर्भात आंदोलनाचा इशारा

मालेगाव, ८ ऑगस्ट २०२० : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठाच्या प्रथम, द्वितीय आणि इंजिनीअरिंगच्या तृतीय वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आला. यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे असे म्हणणे आहे की जर परीक्षा झाल्या नसतील तर शुल्क का घेतले गेले? विद्यार्थ्यांचे शुल्क विद्यार्थ्यांना परत केले जावे अशी मागणी अभाविपने केली आहे.

याच सोबत अभाविपने अशी मागणी केली आहे की विद्यार्थ्यांना २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील शैक्षणिक शुल्कात ३० टक्के सूट देण्यात यावी. या ३० टक्के शुल्कामध्ये ज्या सुविधांचा वापर महाविद्यालयातील विद्यार्थी करणार नाहीत त्या सुविधांसाठी घेतले जाणारे शुल्क माफ केले जावे. यामध्ये वाय-फाय शुल्क असेल, जिमखाना शुल्क असेल, पार्किंग असेल, लॅब मेन्टेनन्स असेल, इ. अशा सर्व प्रकारचे शुल्क माफ करण्यात यावे अशी अभाविपने मागणी केली आहे.

वरील मागण्यांवर निर्णय लवकरात लवकर द्यावा अन्यथा विद्यार्थी परिषद तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा आज दिनांक ७ ऑगस्ट रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या वतीने विद्यालय प्रशासनाला देण्यात आला यावेळी मालेगाव शहर मंत्री कामेश गायकवाड, शहराचे प्रमुख कार्यकर्ते स्वराज निकम आणि शुभम लोंढे तसेच मालेगाव शहर विस्तारक सचिन लांबूटे उपस्थित होते.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा