IMF प्रमुखांचा इशारा- जगावर वाढतोय मंदीचा धोका, तातडीनं पावलं उचलण्याची गरज

पुणे, ७ ऑक्टोंबर २०२२: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) जगाला वाढत्या मंदीच्या धोक्याबाबत इशारा दिलाय. आयएमएफच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी गुरुवारी जागतिक धोरणकर्त्यांना पुढील संकट टाळण्यासाठी धोरणात्मक कारवाई करण्याचं आवाहन केलं. पुढील आठवड्याच्या वार्षिक बैठकीपूर्वी, त्यांनी संकटाचा सामना करण्यासाठी एकत्र काम करण्याची आवश्यकता पुनरुच्चार केली.

लवकरच ठोस पावले उचलली पाहिजेत

IMF प्रमुख म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्थेला भूतकाळात एकापाठोपाठ एक अनेक मोठे धक्के सहन करावे लागले आहेत. त्यामुळं जगभरात मंदीचा धोका मोठ्या प्रमाणात वाढलाय. अशा स्थितीत धोकादायक ‘न्यू नॉर्मल’ टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्या लागतील, कारण जागतिक अर्थव्यवस्था स्थिर करणं अत्यंत आवश्यक आहे. यादरम्यान क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनीही वाढत्या महागाईचा उल्लेख केला. ते म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्था अजूनही कोरोना महामारी, रशिया-युक्रेन युद्ध आणि हवामान बदलासारख्या आव्हानांना तोंड देत आहे.

महागाईच्या आव्हानांचा उल्लेख

क्रिस्टालिना म्हणाल्या की, महागाईसारख्या आव्हानांना लवकरच सामोरं जावं लागणार आहे. चलनवाढ रोखण्यासाठी मध्यवर्ती बँकांनी आक्रमकपणे व्याजदरात वाढ करत राहिल्यास, यामुळे दीर्घकाळ आर्थिक मंदी येऊ शकते. पीटीआयच्या वृत्तानुसार, वाढती महागाई आणि माफक वेतनवाढ यांच्या संयोगावर आयएमएफने चिंता व्यक्त केलीय. आयएमएफ आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीपूर्वी जारी करण्यात आलेल्या अहवालात म्हटलं आहे की, सध्याची उच्च महागाई आणि माफक वेतनवाढ यांच्या संयोगाने वेतनासह किमतीत वाढ होण्याची चिंता निर्माण झालीय.

जागतिक अर्थव्यवस्थेत स्थिरतेची गरज

जॉर्जटाउन विद्यापीठातील एका कार्यक्रमात बोलताना, क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी सर्वात तात्काळ आव्हानांना तोंड देऊन जागतिक अर्थव्यवस्था स्थिर करणं आवश्यक असल्याचे म्हटलं. ते म्हणाले की, जगातील अनेक अर्थव्यवस्थांमध्ये २०२१ पासून महागाईत मोठी वाढ झालीय. यावेळी धोरणकर्त्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखाने २०२६ पर्यंत जगाचा विकास दर ४,००० अब्ज डॉलरपर्यंत घसरण्याची शक्यता वर्तवली आहे.

जागतिक आर्थिक वाढीचा अंदाज कमी

जॉर्जिव्हाच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आधीच तीन वेळा जागतिक आर्थिक वाढीचा अंदाज कमी केलाय. २०२२ मध्ये ते ३.२ टक्क्यांपर्यंत घसरण्याचा अंदाज होता, पण आता तो २.९ टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पुढील आठवड्यात १८० हून अधिक देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँक गव्हर्नर वॉशिंग्टनमध्ये भेटणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा