जगासाठी धोक्याची घंटा, तीनपट वेगाने वितळतायत ग्लेशियर्स

पुणे, ७ जून २०२३: जागतिक तापमानात झालेली वाढ आणि वाढत्या प्रदूषणामुळे पृथ्वीवरील मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहेत. कार्बन उत्सर्जन आणि जागतिक तापमानवाढीमुळे ध्रुवीय प्रदेशात थंडी कमी होत असून हिमनद्यांचा बर्फ वितळत आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की ग्रीनलँडमधील हिमनद्या आता २० व्या शतकाच्या तुलनेत ३ पट वेगाने वितळत आहेत.

ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. त्याचे क्षेत्रफळ २,१६६,०८६ चौरस किमी आहे. हे पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर स्थित आहे. आणि म्हणूनच त्याचा बहुतेक हिस्सा बर्फाने झाकलेले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत येथे असलेला बर्फ वितळत असून कमी होत आहे. येथे अनेक मोठे बर्फाचे पर्वत आणि हिमनद्या आहेत, ज्यांचे वितळणे जगासाठी धोक्याची घंटा आहे.

जिओफिजिकल रिसर्च लेटर्सच्या अभ्यासानुसार, ग्रीनलँडच्या हिमनद्याच्या जलद वितळण्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे आणि ध्रुवीय प्रदेशात हिमनद्या वितळत राहिल्यास किनारपट्टी असलेले अनेक देश बुडू लागतील. आतापर्यंत, जगाच्या अनेक भागांमध्ये वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे, मानवी वस्त्या विस्थापित झाल्या आहेत, आणि लोक बेघर झाले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनीधी: केतकी कालेकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा