एमएक्स प्लेअरवर पाहा हे मराठी शो मोफत

एमएक्स प्लेअरने आपल्या लायब्ररीमधून अशी एक मराठी बिंज लिस्ट बनवली आहे जी घरी असाणाऱ्या आणि पाहण्यासाठी काही नवीन नसलेल्यांसाठी मोठी पर्वणीच ठरेल. त्यामुळे ट्युन इन करा आणि पाहा काही उत्तमोत्तम कथा, अगदी मोफत.

मराठी टीव्ही शो, चित्रपट असो किंवा नाटक, दर्जेदार सादरीकरण, सशक्त आशय आणि सकस अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांसाठी काळापुढचे मनोरंजन सादर केल्यामुळे मराठी मनोरंजनविश्वाचे नेहमीच कौतुक होत आले आहे. हाच ट्रेंड आता डिजिटल माध्यमांमध्येही पाहायला मिळत आहे. एमएक्स प्लेअरसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर भारतीय प्रेक्षकांना प्रादेशिक भाषांमधल्या दमदार कलाकृती पाहायला मिळत आहेत.

समांतर- कुमार महाजन नामक व्यक्तीचा प्रवास ‘समांतर’मध्ये दाखवण्यात आला आहे. त्याच्या जीवनात एक मोठी उलथापालथ होते जेव्हा त्याला कळते की, सुदर्शन चक्रपाणि नामक व्यक्तीचा भूतकाळ हा त्याचा भविष्यकाळ असेल. कुमार महाजनची व्यक्तिरेखा साकारणारा मराठीतला सुपरस्टार स्वप्नील जोशी ‘समांतर’ या थ्रिलरमधून डिजिटल पदार्पण करत आहे. यात तो अशा एका सर्वसामान्य व्यक्तीची भूमिका साकारत आहे ज्याच्या आयुष्यात काहीच नीट घडत नाही आहे. तो आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकत नाही, त्याची नोकरी जाते आणि अगदी लहानातली लहान गोष्टही त्याच्यासाठी तापदायक ठरत आहे. सौंदर्यवती अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने त्याच्या पत्नीची भूमिका केली आहे. ९ भाग असणाऱ्या या मालिकेचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले आहे.

आणि काय हवं- प्रत्यक्ष आयुष्यात पती-पत्नी असणारे उमेश कामत आणि प्रिया बापट यामध्ये मुख्य कलाकार आहेत. यामध्ये नवपरिणीत जोडप्याचे आयुष्य दाखवण्यात आले आहे. नव्याने खुलणाऱ्या प्रणयाचा योग्य रंग यात अचूकपणे टिपला आहे. नुकतेच लग्न झालेल्या जोडप्यांच्या आयुष्यात प्रथमत:च ज्या गोष्टी घडतात, त्याचा प्रवास या सीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे. पहिले घर, पहिली कार किंवा पहिला विमानप्रवास अशा छोट्या छोट्या गोष्टी यात दाखवण्यात आल्याने अनेक तरुण-वृद्ध जोडप्यांच्या मनात जुन्या स्मृतींचा गंध पुन्हा दरवळेल. या हलक्याफुलक्या रोमॅण्टिक सीरिजमुळे प्रत्येकाच्या मानतली जोडीदाराप्रतीची निर्व्याज प्रेमाची भावना नक्कीच बळकट होईल.

पांडू- या सीरिजमध्ये मुंबई पोलिसांच्या दैनंदिन आयुष्यावर गमतीशीर पद्धतीने भाष्य करण्यात आले आहे. सुहास शिरसाट आणि दीपक शिर्के यांच्या प्रमुख भूमिका असणारी ‘पांडू’ ही सीरिज गमतीशीर, नाट्यमय आणि टोकदार विनोद असणारी आहे. शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध असणाऱ्या वीरांच्या आयुष्यावर ही सीरिज बेतलेली आहे.

वन्स अ इयर- रोमान्स आणि प्रेमाचा आगळावेगळा ट्विस्ट असणाऱ्या या ६ भागांच्या सीरिजमध्ये मृण्मयी गोडबोले आणि निपुण धर्माधिकारी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एका जोडप्याचा सहा वर्षांचा रोमॅण्टिक प्रवास यात दाखवण्यात आला आहे. कॉलेजमधले आणि कॉलेजपलकिडचे त्यांचे दिवस यात दाखवण्यात आले असून या रोमकॉममध्ये मैत्री, प्रेम आणि जवळीक यांच्यातला अंश नेमकेपणाने टिपला आहे.

फेमसली फिल्मफेअर मराठी- ‘फेमसली फिल्मफेअर’ या अत्यंत नावाजलेल्या शोची ‘फेमसली फिल्मफेअर मराठी’ ही प्रादेशिक आवृत्ती एमएक्स प्लेअरने आणली आहे. या सेलिब्रेटी चॅट शो सीरिजमध्ये तुमच्या आवडत्या सेलिब्रेटीची खेळकर बाजू पाहायला मिळेल. लोकप्रिय व्यक्तींच्या खासगी आयुष्याचे अनेक पैलू यात उलगडून दाखवण्यात आले आहेत. शिवाय त्यांच्याबाबतच्या अनेक माहिती नसलेल्या गोष्टीही यात उघड होणार असल्याने गॉसिपसाठी भरपूर मसाला यातून मिळेल. या शोची होस्ट अमृता खानविलकर असून अनेक नामवंत सेलिब्रेटी या शोमध्ये हजेरी लावतील.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा