बारामती, ११ ऑक्टोबर २०२०: बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात शनिवारी (दि. १०) रात्रभर झालेल्या पावसामुळं मोरगांव – सुपे रस्ता काल पाण्याखाली गेला. येथील ओढ्यावरील पुलावरुन वेगानं पाणी वाहत असल्यानं दुचाकी स्वार व वाहनचालकांना पाणी कमी होईपर्यंत थांबावं लागलं.
काल शनिवारी (दि. १०) दिवसा रात्रभर तालुक्याच्या ग्रामीण पट्ट्यातील मोरगांव, सुपा, मुर्टी, लोणी भापकर आदी परीसरात मुसळधार पाऊस पडला. यामुळं आज सकाळी खंडु खैरेवाडी येथील काळ ओढ्याला पुर आला होता. हा ओढा मोरगांव -सुपारस्त्याला भेदून पुढं कऱ्हा नदी पात्राला मिळतो. मुसळधार पावसानं ओढ्याला पाणी वाढल्यामुळं रस्त्यावरून पाणी वाहु लागले आहे.
अष्टविनायक मार्ग हा मोरगांव वरुन पुढं सुपे चौफुल्यापर्यंत जातो. या रस्त्यावर डांबरीकरण व जागोजागी पुल बांढले आहेत. मात्र, काल झालेल्या पावसामुळं पुलाची उंची अवघ्या १० फुट अंतरापेक्षा कमी असल्यामुळं पुलावरून पाणी वाहु लागले. हा राज्य मार्ग असल्यानं यावरून नेहमीच मालवाहतुक व खाजगी गाड्यांची वर्दळ असते.
पुलावरुन वेगानं पाणी वाहत असल्यामुळं अनेक दुचाकीस्वार जीव मुठीत धरून जाताना आढळत होते. उशीरापर्यंत पुलावरून पाणी वाहत होते.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव