मराठी पत्रकार परिषदेमार्फत वनक्षेत्रातील पाणवठ्यात सोडले पाणी; वन्यप्राण्यांची पाण्याची भटकंती टळणार…

इंदापूर, दि. ७ऑक्टोबर २०२०: मराठी पत्रकार परिषद संलग्न इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने मौजे कळस (ता. इंदापूर) येथे वनविभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या वन्यजीव सप्ताहानिमीत्त वनक्षेत्रातील पाणवठा हौदामध्ये वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले.

यावेळी इंदापूर वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, कळस येथील दैनिक लोकमतचे पत्रकार व मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्हा सरचिटनीस सतीश सांगळे, वालचंदनगर दैनिक सकाळचे पत्रकार व इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष राजकुमार थोरात, अंथुर्णे दैनिक पुढारीचे पत्रकार धनंजय थोरात, बाभूळगाव दैनिक लोकमत पत्रकार सुधाकर बोराटे, कळस दैनिक सकाळ पत्रकार सचिन लोंढे, कळस दैनिक पुढारी पत्रकार बाळासाहेब धवडे, कुरवली दैनिक लोकमत पत्रकार बाळासाहेब कवळे, नरसिंहपुर दैनिक लोकमत पत्रकार बाळासाहेब सुतार, वालचंदनगर दैनिक लोकमत पत्रकार प्रदिप तरंगे, लासुर्णे दैनिक प्रभात पत्रकार रोहीत वाघमोडे, जक्शंन वनपाल अशोक नरूटे, वनकर्मचारी ज्ञानदेव ससाणे उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा