कर्जत, २५ जुलै २०२० : कर्जत मधील रस्त्याच्या कडेला बांधण्यात आलेल्या गटारीमुळे पावसाचे पाणी तुंबले.ज्यामुळे बालाजी मंदिरात पाणी शिरले. याशिवाय जवळच असलेल्या केशर या हॉटेलचे देखील मोठे नुकसान झाले.
अमरापूर भिगवण या रस्त्याचे काम सध्या वेगात सुरू असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारी बांधण्यात येत आहेत. मात्र या गटारींना योग्य पद्धतीने पाणी आउटलेट करण्याचे काम करण्यात न आल्यामुळे १३२ के व्ही पासून या रस्त्यापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहून येणाऱ्या पाण्याला वाट उपलब्ध न झाल्याने कर्जत येथील बालाजी मंदिरात पाणी शिरले.
शेजारीच असलेल्या केशर व्हेज या हॉटेलमध्येही पाणी शिरल्यामुळे हॉटेलमधील ३ डीप फ्रीज, हॉटेलचे भांडे, आटा, कांदे, पाण्याचे बॉक्स यांचे भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सदर रस्त्याच्या कडेला बांधण्यात येत असलेल्या गटारीचे काम निकृष्ट पद्धतीने होत असून अनेक ठिकाणी खाली वर झालेले आहे. रस्त्याचे कामही अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे त्वरित याकडे लक्ष द्यावे व पाण्यासाठी योग्य प्रकारे वाट करून द्यावी अशी मागणी केली जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष