मुंबईत आता पाणीटंचाई, १ जुलैपासून पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात

मुंबई २८ जून २०२३: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पाणीपातळी कमी झाल्यामुळे महापालिकेने शनिवारपासून पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. असं बीएमसीचे आयुक्त चहल यांनी मंगळवारी सांगितलं. हायड्रोलिक विभागाने प्रस्तावित केलेल्या १०% पाणीकपातीला मान्यता दिली असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्यानुसार, सिडको बुधवारपासून (५ जुलै) पुरवठा क्षेत्रात १५ टक्के कपात करणार आहे. तर, मुंबईत शनिवारपासून (१ जुलै) १०% पाणीकपात केली जाणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (बीएमसी) आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी पाण्याची बचत करून त्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले आहे. चहल यांनी बुधवारी सांगितले की, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा सुमारे सात टक्के असल्याने, बीएमसीने १ जुलैपासून मुंबईतील पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तानसा, मोडकसागर, विहार आणि तुळशी या सात तलावांमधून ३८०० एमएलडी पाणीपुरवठा होतो. कारण तलावांच्या पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस पडतोय, पण आता रविवार पासून मान्सून दाखल झाल्याने, तलावातील पाणीसाठ्यात किती वाढ होतेय यावर पुढील पाणीनियोजन करण्याचे ठरले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा