नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे, गंगापूर धरण तुडुंब असताना, नाशिककरांना पाणी जपून वापरण्याचे निर्देश

नाशिक ०४ आँगस्ट २०२२ : नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण तुडुंब असताना पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान तांत्रिक दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिककरांनी आवश्यक पाणीसाठा करावा, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

पंचवटी विभागातील जलशुद्धीकरण केंद्राच्या आवारातील वॉल नादुरुस्त झाल्या असल्यानी. दुरुस्तीच्या कामासाठी शुक्रवारी दिनांक ५ रोजी हाती घेण्यात येणार आहे.

पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र येथून पाणीपुरवठा प्रभाग क्रमांक १,४,५,आणि ६ मधील संपूर्ण भागात तसेच प्रभाग क्रमांक ३ मधील काही भागत शुक्रवारी दिनांक ५ रोजी दुपारी, सायंकाळी आणि शनिवार दिनांक ६ रोजी पाणी पुरवठा बंद असणार आहे.

शनिवार दिनांक ६ रोजी दुपारी व सायंकाळी प्रभाग १ मधील संपूर्ण म्हसरूळ परिसर, प्रभाग क्रमांक ४ व ५ मधील संपूर्ण मखमलाबाद रोड, पेठ रोड, दिंडोरी रोड, पंचवटी गावठाण परिसर तसेच प्रभाग क्रमांक ६ मधील संपूर्ण मखमलाबाद शिवार , रामवाडी, हनुमानवाडी परिसर तसेच प्रभाग क्रमांक ३ मधील हिरावाडी व लगतच्या परिसरातील नागरिकांनी नोंद घ्यावी आशा भागात पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे. नाशिककरांनी सहकार्य करावे असे नाशिक पाणी पुरवठा विभागाने म्हटले आहे .

न्युज अनकट प्रतिनिधी: विजय सपकाळ

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा