उजनी, १७ सप्टेंबर २०२० : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण ११० टक्के भरले असल्याने सोलापूर महानगरपालिका महापौर श्रीकांचना यंन्नम यांच्या हस्ते उजनी धरण जलाशयाचे भिमानगर येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सोलापूर पंपहाऊस जवळ जलपूजन करण्यात आले.
गेली पंधरा दिवस झाले पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर सततच्या जोरदार पावसामुळे सर्वात मोठा जलसाठा असलेल्या उजनीत मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पाण्यामुळे उजनी धरण ११० टक्के भरले आहे म्हणजेच सुमारे १२२ टीएमसी पाणी साठा उजनीत जमा झाला आहे.कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारामुळे साध्या पध्दतीने प्रशासकीय नियमाप्रमाणे व सालाबादप्रमाणे या ही वर्षी भिमानगर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सोलापूर पाणी पुरवठा पंपहाऊस येथे जलाशयाचे जलपूजन करण्यात आले.
यावेळी माननीय महापौर श्रीकांचना यन्नम व अधिकारी,पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी-प्रदीप पाटील