छत्रपती संभाजीनगर, १६ मार्च २०२३ : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस हे जलसंपदामंत्री झाल्यापासून एकदाही गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळात बैठक घेण्यात आली नाही. यामुळे जलसंपदा विभागातील अधिकारी हे कोट्यवधींचे टेंडर घोटाळे करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याने त्यांच्या कार्यकाळात पाचशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याने, याची नैतिक जबाबदारी जलसंपदामंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य तथा मराठवाडा बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी ता. १५ मार्च रोजी पत्रकार परिषदेत केली आहे.
यावेळी त्यांनी ही योजना म्हणजे शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त करणारा कट असल्याचे आरोपी केले आहे.
यावर्षीच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी १०,५०० कोटींची घोषणा केली.ही घोषणा म्हणजे मराठवाड्याच्या भावनेशी खेळणारी घोषणा आहे. जायकवाडी धरणातून वॉटर ग्रीड योजमोठी ११ मोठी धरणे जोडली जाणार आहेत. मात्र,
योजनेसाठी पर्यावरण समितीची परवानगी नाही, पाणी उपलब्धता प्रमाणपत्र परवानगी नसल्यामुळे ही योजना केंद्र शासनाच्या दरबारात अडकली.
११ मोठी धरणे जोडण्याचा जो प्रस्ताव आहे, तो इंजिनिअर्सच्या मते पाइपलाइनने जोडणे शक्य होणार नाही. पाणीच नसल्यामुळे शेतीला ७५ टक्के, पिण्याला १५ टक्के, उद्योगधंदा १० टक्के असा नियम आहे. धरणात पाणी नसेल तर योजनेसाठी पाणी कुठून येणार; तसेच वॉटरग्रीड योजना जाहीर करण्यापूर्वी जलसंपदामंत्र्यांनी मराठवाड्याच्या हक्काचे असलेले अहमदनगर व नाशिककडे दिलेले पाणी आधी द्यायला हवे. वॉटरग्रीड योजनेबद्दल त्यांनी गोदावरी पाटबंधारे विभाग येथे बैठक घेऊन भूमिका स्पष्ट करायला हवी होती, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थिती केला आहे.
यामुळे येत्या २० मार्चला विभागीय आयुक्त कार्यालयावर देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनामासाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : विनोद धनले