तुळजापूर – बसवंतवाडी : संकल्पना घेऊन युनिसेफ अंतर्गत काम करणाऱ्या संपर्क संस्था मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार संवाद मंच तुळजापूर या एनजीओ कडून बसवंत वाडी येथे श्रमदानातून आणि लोकसहभागातून सीसीटी बंधारे खोदण्यासाठी 29 दिवस साडेतीनशे ग्रामस्थांच्या मदतीने करण्यात आलेल्या श्रमदाना मधून बसवंतवाडी येथे चार हजार ते साडेचार हजार सीसीटी बंधारे खोदण्यात आले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते यांच्या शुभहस्ते सुरू झालेल्या या कामाला उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी डॉक्टर दीपा मुधोळ आणि सभापती शिवाजीराव गायकवाड पंचायत समिती तुळजापूर यांनी भेट दिली आणि बसवंतवाडी येथील ग्रामस्थांनी केलेल्या श्रमदानाचे कौतुक केले
दुष्काळग्रस्त असणार्या तुळजापूर तालुक्यामध्ये राज्य शासनाच्या मदतीने गेल्या पंधरा वर्षांमध्ये साठवण तलाव आणि जलयुक्त शिवार योजना याच्या माध्यमातून शेती आणि शेतकऱ्यांना पाणी देण्याचा प्रयत्न झाला त्यामधून तुळजापूर या डोंगराळ असणाऱ्या तालुक्याला बागायती क्षेत्र करण्यासाठी क्रांतिकारक मदत झालेली आहे तालुक्याचे तत्कालीन आमदार मधुकरराव चव्हाण यांनी आपल्या पंचवीस वर्षाच्या कार्यकाळात या तालुक्याला पाणीदार करण्यासाठी आणि शेतकऱ्याला आर्थिक उन्नती होण्याच्या अनुषंगाने साठवण तलावाची व इतर सिंचन योजनांची मालिका राबवली सतत पाणी जमिनीमध्ये मुरण्याचे आणि आपले पाणी आपल्या परिसरात ठेवण्यासाठी साठवण्यासाठी शासकीय योजना राबवण्यासाठी साठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्याचे फलश्रुती म्हणून सुमारे सात हजार हेक्टर ऊस तुळजापूर तालुक्यात शहरामध्ये उभा आहे पाण्याने केलेल्या क्रांतिकारक बदलामुळे तुळजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात उसाची शेती निर्माण झाली त्यापाठोपाठ द्राक्षाची शेती देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे सुमारे एक हजार एकर एवढ्या मोठ्या क्षेत्रांमध्ये द्राक्ष लागवड होऊन तुळजापूर तालुक्याचे डोंगराळ आणि कुसळी गवताचा तालुका आहे विरुद्ध पुसून टाकण्यात आले मधुकराव चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी केलेल्या कामाला सर्व शेतकऱ्यांनी आणि तुळजापूर विधानसभा मतदार संघातील सर्व शेतकरी बांधवांनी जाणीवपूर्वक लक्षात ठेवलेले आहे
मात्र पिण्याच्या पाण्याची वानवा या तालुक्याला आजही जाणवते आहे त्यामुळे आमदार संवाद म्हणजे या एनजीओ संस्थेने बसवंत वाडी तालुका तुळजापूर येथे पाणीदार बसवंतवाडी समृद्ध बसवंतवाडी असा उपक्रम लोकसभा वाघा मधून उभा केला बसवंतवाडी येथील महिला भगिनी बचत गटाच्या महिला आणि येथील नागरिक तरुण विद्यार्थी या सर्वांनी तसेच बसवंतवाडी येथील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी एक महिना श्रमदान करून आपल्या गावाला पाणीदार करण्यासाठी कष्ट उपसले त्यामुळे 2020 यावर्षी बसवंतवाडी हे पिण्याच्या पाण्यासाठी आणि गावाच्या गरजेसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी सक्षम झालेले आहे आणखी किमान एक वर्षानंतर आणि कमाल दोन वर्षानंतर बसवंतवाडी हे परिपूर्ण पाणीदार गाव म्हणून जगासमोर येणार आहे
हिंदी चित्रपट अभिनेता आमिर खान याने पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून उभे केलेल्या कामाची दखल महाराष्ट्रातील आणि देशातील प्रसारमाध्यमांनी घेतली त्याचे अनुकरण अनेक गावांनी केले त्यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये देखील शेकडो गावाने सहभागी होऊन आपल्या गावाला परिपूर्ण करण्यासाठी आणि पाणी अडवण्याच्या धोरणाला पाठिंबा देण्यासाठी काम केले आणि आपल्या गावाला बक्षिसे आणि सन्मान मिळवून दिला त्यापेक्षा तुळजापूर तालुक्यातील बसवंत वाडी येथे सकाळी सहा वाजेपासून सकाळच्या दहा वाजेपर्यंत साडेतीनशे लोकांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेले श्रमदान निश्चित श्रेष्ठ आहे अगदी अशिक्षित महिला आणि अशिक्षित शेतकरी देखील श्रमदान करण्यासाठी पुढे आला तेव्हा प्रशासन देखील फक्त झाले आणि बसवंतवाडी येथील ग्रामस्थांच्या मानसिकतेचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले
तुळजापूर तालुक्याच्या इतिहासामध्ये आणि श्रमदाना मधून केलेल्या कामाच्या नोंदीमध्ये बसवंतवाडी येथील लोकांनी केलेल्या शब्दाला खूप मोठे महत्त्व आहे त्याची मुक्तकंठाने स्तुती जिल्हाधिकारी डॉक्टर दीपा मुधोळ यांनी आपल्या भाषणांमधून केली याशिवाय बसवंतवाडी येथे सामाजिक वनीकरण यांच्यावतीने करण्यात आलेल्या वृक्षारोपण आला देखील उत्तम प्रतिसाद मिळाला आहे सामाजिक वनीकरण आणि त्यांचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी बसवंत वाडी येथे पाणीदार बसवंतवाडी समृद्ध बसवंतवाडी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी चांगली पूर्वतयारी करून वृक्षारोपण केलेले आहे त्याला झालेली चांगली वाढ भविष्यात बसवंतवाडी च्या मार्गावर थंड सावली देणारे आणि पर्यावरणाचा समतोल राखणारे उत्तम पाऊल ठेवणार आहे
सामाजिक वनीकरण तालुका तुळजापूर यांनी सामाजिक वनीकरण जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली बसवंतवाडी येथे सुमारे एक हजार देशी झाडांची लागवड केली आहे वड पिंपळ लिंब अशी पर्यावरणासाठी अत्यंत उपयुक्त झाडे लावली आहेत आणि त्याची लागवड करण्यापासून संगोपन करण्यापर्यंत काळजी घेतली आहेत सामाजिक वनीकरण खात्याकडून महामार्ग नळदुर्ग ते बसवंतवाडी गाव आणि बसवंतवाडी गाव ते आळणी गाव अशा दोन टप्प्यांमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून सदर वृक्ष तोड होणार नाही आणि वृक्ष ची वाढ चांगल्या पद्धतीने करण्यासाठी नियुक्ती केली आणि नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना केलेल्या कामामुळे आणि अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे बसवंतवाडी येथील वृक्षारोपण अत्यंत चांगल्या पद्धतीने उभारी घेतलेले आहे एक वर्षामध्ये या झाडाने जवळपास आठ फूट उंच एवढी चांगली उंची धारण केली आहे भविष्यामध्ये या झाडांचे फायदे बसवंतवाडी आणि परिसरातील लोकांना मिळणार आहेत
यशवंत वाडी येथे तरुणांना रोजगार देण्यासाठी आणि स्वयंरोजगार करण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले विविध बँका आणि रोजगार देणाऱ्या संस्था यांचे मेळावे घेऊन तरुणांना काम देण्याचा प्रयत्न करण्यात आला येथील पशुधन सक्षम होण्याच्या अनुषंगाने पशुधन चिकित्सा शिबिर संपन्न झाले त्याचबरोबर गावातील सर्व नागरिक आणि ग्रामस्थ यांची आरोग्य तपासणी करण्यात आली बसवंतवाडी जिल्हा परिषद प्रशाला मधील विद्यार्थ्यांना आमदार संवाद म्हणजे यांच्याकडून मोफत वह्यांचे वितरण करण्यात आले. बचत गटा मध्ये काम करणाऱ्या महिलांना मार्गदर्शन करणारे काही कार्यक्रम बसवंत वाडी येथे संपन्न झाले याशिवाय
टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या तुळजापूर येथील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बसवंतवाडी येथे श्रमदान केले या शहरांमध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी प्राध्यापक आणि प्रशासनातील अधिकारी सहभागी झाले होते येथील ग्रामस्थांचा उत्सवा आणि गावाची गरज लक्षात घेऊन या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपला महाविद्यालय प्रकल्प म्हणून बसवंतवाडी ला हाताशी धरले आणि येथील महिलांना एका नव्या वाटेवर आणून बसवंत वाडी येथे महाराष्ट्रातील पहिली शेळीच्या दुधाची डेअरी दूध संकलन केंद्र सुरू केले त्यालाही आता चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे आणि त्यातून बसवंतवाडी येथील शेळी उद्योग करणाऱ्या शेतकरी आणि महिला वर्गांना जोड व्यवसाय मिळाला आहे.