‘आम्ही चर्चेसाठी तयार’ केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे कुस्तीपटूंना निमंत्रण

7

नवी दिल्ली, ७ जून २०२३: केंद्रीय क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. आम्ही चर्चेला तयार आहोत असे म्हणत ठाकूर यांनी एक प्रकारे केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. ऑलिंपिक पदक विजेता बजरंग पुनिया याने माध्यामांना याबाबत माहिती दिली होती की, कुस्तीपटू आणि त्यांच्या प्रशिक्षकांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत गृहमंत्र्यांनी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्याचेही यावेळी बोलताना पुनिया याने सांगितले आहे.

गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर कुस्तीपटू आश्वस्त झाले आणि कामावर पुन्हा रुजू झाले. पण त्यांनी आपले आंदोलन सुरूच असल्याचेही सांगितले. त्यामुळे आता क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी मध्यरात्री केलेल्या एका ट्विटमधून सरकार कुस्तीपटूंशी त्यांच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार आहे. मी पुन्हा एकदा कुस्तीपटूंना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. असं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा