सातारा, १६ मे २०२३: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी मांडलेले विचार योग्यच आहेत. मी मान्य करतो, परंतु विश्वासघात करण्याची आमची परंपरा नाही. अखेरीस निवडणुकीत कोण काय करतंय, कोण काय करत नाही, हा भाग वेगळा अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला.
सातारा दौऱ्यावर आले असता शरद पवार यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली होती. उदयनराजे यांच्यावर भाजपाने मोठी जबाबदारी दिली तरी राष्ट्रवादीवर काहीही परिणाम होणार नाही. त्यांनी लोकसभेच्या पोटनिवडणुकीत अनुभवले आहे, असा टोला लगावला होता. त्यावर आज खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित तरुण-तरुणींना नोकरीची संधी मिळावी, यासाठी महाराष्ट्र शासनाने दि. २१ व २२ मे कालावधीत यशोदा टेक्निकल कॅप्मस येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम खासदार उदयनराजे भोसले यांच्या पुढाकारातून होणार आहे. त्यांची माहिती आज जलमंदिर पॅलेस येथे दिली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर