कोरोनाबरोबर जगण्याची कला विकसित करावी लागणार: नितीन गडकरी

नवी दिल्ली, दि.१४ मे २०२० : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधताना १८ मे पासून लॉकडाऊनचे चौथे पर्व लागू करण्यात येणार आहे, असे सांगितले. हा चौथा टप्पा वेगळ्या स्वरूपाचा असणार आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे, की आपल्याला कोरोना विषाणू संकटाशी सामना करत जीवन जगण्याची कला विकसित करावी लागणार आहे, असं मत त्यांनी ट्विटरद्वारे केले आहे.

गडकरी यांच्या या वक्तव्यामुळे लॉकडाऊनचा चौथा टप्पा लागू करण्यात येणार असला तरी कोरोना सोबत जगणं अर्थात को-एक्सिस्टिंग विथ कोरोना , बाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याचं स्पष्ट झालंय.अस पहायला मिळत आहे.
कोरोना सोबत जगत असताना घरामध्ये अथवा ऑफिसमध्ये प्रवेश करताना सॅनिटायझरचा वापर, इतरांपासून किमान १ मीटरचे अंतर ही काळजी घेण्यासंबंधीच्या सूचना गडकरींनी केल्या आहेत.

पुढे गडकरी म्हणाले की, लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासून बंद असलेली केश कर्तनालये, ब्युटी पार्लर व मॉल्स लवकरच सुरु केली जातील. मात्र त्यांनी कोरोना संबंधीच्या सर्व खबरदारी घ्याव्याच लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा