मुंबई, ८ सप्टेंबर २०२०: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पायगुणामुळे आमची सत्ता गेली, असं वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे.
शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे विधान परिषदेच्या उपसभापती पदी आल्या आणि आमचं सरकार आलं. म्हणून त्यांना पुन्हा या पदावर नियुक्त केलं, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितलं. यावर बोलताना दरेकरांनी अजित पवारांच्या पायगुणामुळे आमची सत्ता गेल्याचं म्हटलंय. अजितदादांचा पायगुण काय होता हे महाराष्ट्राने पाहिलं. आमच्यासोबत अजितदादा आले. त्यावेळी सत्तेचं काय झालं?, असा टोला दरेकरांनी अजित पवारांना लगावला.
दरम्यान, विधानपरिषद उपसभापती निवडीवर आमचा आक्षेप कायम आहे. अशी भूमिका प्रवीण दरेकर यांनी यावेळी मांडली. सरकारची भूमिका हट्टाची आहे. न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे, असं असतानाही देखील निवडणूक घेण्यात आली, असं प्रवीण दरेकर म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे