“आम्ही पुणेकर”लय भारी, बघा आनंदी शहरांच्या यादीत तुम्हच्या शहराचे नाव आहे का?…..

पुणे, ७ जानेवारी २०२१: संपूर्ण देशात एक सर्व्हे करण्यात आला आहे. ‘इंडियन सिटीज हॅपीनेस रिपोर्ट २०२०’ ची यादी जाहिर करण्यात आली आहे.देशातील सर्वाधिक आनंदी आसणार्या ३४ शहरांची नावे देण्यात आली आहेत. तर यामधे महाराष्ट्रातील देखील तीन शहरांचा सामावेश आहे आणि आज आपण त्या बद्दलच जाणून घेणार आहोत.

आम्ही पुणेकर…..

पुणेकर म्हणजे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगभरात आपल्या संस्कृती मुळे प्रसिद्ध आहे. तर नेहमीच”आम्ही पुणेकर”म्हणून प्रत्येकाच्या नाकावर टिचून तोर्यात सांगत असतात आणि पुन्हा एकदा हि गोष्ट खरी ठरली आहे. “आम्ही पुणेकर महाराष्ट्रात लय भारी”म्हणत आहेत. या आनंदी राहण्याच्या बाबतीत देशात पुणे १२ व्या नागपूर १७ व्या तर मुंबई २१ व्या स्थानी आहेत. म्हणजेच महाराष्ट्रात पुणे अव्वल स्थानी विराजमान आहे.

बघुयात आनंदी शहरे…..

देशातील सर्वाधिक आनंदी शहरांच्या यादीत लुधियाना, अहमदाबाद आणि चंदिगड हि तीन शहरे अव्वल स्थानी आहेत. तर पुढे सुरत, वडोदरा, अमृतसर, चैन्नई, जयपूर, जोधपूर, हैद्राबाद, भोपळ, पुणे, नवी दिल्ली, देहरादून, फरिदाबाद, पाटणा, नागपूर, इंदूर, कोच्ची,भुवनेश्वर, मुंबई, गुहावटी, धनबाद, नोएडा, जम्मू, कानपूर, बंगळूरू, कोलकाता, लखनऊ, शिमला, रांची गुरूग्राम, विशाखापट्टणम, रायपूर या शहरांचा समावेश आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा