महामोर्च्यासाठी मुंबईतील शिवाजीपार्क, बीकेसी आणि आझाद मैदान आम्हाला लागणार- मनोज जरांगे पाटील

38

३० डिसेंबर २०२३ : मुंबईतले शिवाजीपार्क, बीकेसी आणि आझाद मैदान हे तिनही मैदान आम्हाला लागत असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हंटलंय. काल जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळांनी मुंबईतल्या मैदानाची पाहणी केली होती. त्यानंतर मुंबईत जाणार्या मराठ्यांची संख्या मोठी असल्यानं हे तिनही मैदाने लागतील, मात्र आमरण उपोषण हे आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क या दोनही पैकी एका मैदानात होईल असं जरांगे पाटील यांनी म्हंटलंय.

त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल आम्हाला राग नाहीये. ते मराठा आरक्षणासाठी काम करत आहेत असंही जरांगे पाटील यांनी म्हंटलंय.. दरम्यान मनोज जरांगे पाटील हे येत्या ४ जानेवारी ते ८ जानेवारीपर्यंत गोदा पट्ट्यातील १२३ गावांचा दौरा करणार आहेत, यावेळी ते मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांशी गाठीभेटी करणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी