राज्यात हवामानाचा लहरीपणा! थंडी आणि उन्हाच्या खेळाने नागरिक हैराण

68

मुबंई २९ जानेवारी २०२५: मुंबईसह संपूर्ण राज्यात हवामानाने नाट्यमय वळण घेतले असून ,सकाळी गारवा आणि दुपारी कडक उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहे रात्रीच्या थंडीने कुडकुडणाऱ्या नागरिकांना दिवसा मात्र प्रचंड उष्णेतेचा सामना करावा लागत आहे .हवामान विभागाच्या अंदाजानुसार हि स्थिती पुढील आठवडाभर कायम राहण्याची शक्यता आहे

राज्यातील किमान तापमानात वाढ झाल्याने हिवाळाच्या प्रभाव कमी होत असून , उन्हाच्या होरपळ वाढली आहे दिवसागणिक तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे विशेषत मुंबई ,पुणे , नागपूर, आणि इतर मोठया शशहरांन मध्ये या बदलाचा मोठा परिणाम दिसून येत आहे

दरम्यान ,दक्षिण भारतातही हवामान बदल होण्याची शक्यता आहे तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि केरळमध्ये ३० जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान मुसळधार
पावसाचा अंदाज आहे ,त्यामुळे या भागात थंडी वाढणार आहे

हवामानातील या अस्थिरतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून ,सर्दी ,ताप आणि त्वचारोगचे प्रमाण वाढले आहे तज्ज्ञांनी योग्य आहार आणि योग्य कपड्याचा वापरण्याचा सल्ला दिला आहे थंडी आणी उष्णेतेच्या या दुहेरी तडाख्यामुळे नागरिकांची कोंडी झाली असून ,हवामान आणखी कोणते नवे रंग दाखवणार आहे ,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे