पुण्यात वीकेंड लॅाकडाऊन सुरुच, मात्र निर्बंध शिथील होण्याची शक्यता

18
पुणे, १९ जून २०२१: कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यात  राज्य सरकारला यश मिळालं. ज्याचा परिणाम म्हणून निर्बंध कमी करण्याची शक्यता आहे. सध्या रुग्णांचा पॅाझिटिव्हीटी रेट दोन आठवड्यापासून पाच टक्क्यांखाली आला आहे. सरकारने पॅाझिटिव्हिटी दर आणि खाटांची उपलब्धता यानुसार निर्बंध शिथील करणार असल्याचे नमूद केले. पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतले जाणार आहे.  यात वीकेंड लॅाकडाऊन बंद करणार का? तसेच नाट्यगृहे, सिनेमागृहे सुरु करणे. दुकांनाच्या वेळेमध्ये वाढ करणे. पिंपरी-चिंचवडमधील लॅाकडाऊन शिथील करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
मात्र सध्या वीकेंड लॅाकडाऊन सुरुच रहाणार असून अत्यावश्यक सेवेतली दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंच खुली राहतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ५० टक्के क्षमतेने सुरु राहिल. रेस्टॅांरंट आणि बार शनिवार आणि रविवारी केवळ पार्सल सेवा देऊ शकणार.
सध्या पुण्याचा रुग्ण दर ४.८६ टक्के झाला आहे. त्यामुळे केवळ १७ टक्के रुग्ण उपचार घेत असून शिथीलीकरणात पुण्याचा समावेश होऊ शकतो.
मात्र पिंपरी -चिंचवडमध्ये हा दर ५.०१ टक्के आहे. त्यामुळे तिथल्या निर्बंधांवरचा निर्णय आज होणे अपेक्षित आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : तृप्ती पारसनीस