कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला चौथे मेडल, वेटलिफ्टर बिंदियारानी देवीने जिंकले रौप्यपदक

Bindyarani Silver Medal, ३१ जुलै २०२२: राष्ट्रकुल 2022 मध्ये भारताला चौथे पदक मिळाले आहे. बिंदियारानी देवीने महिलांच्या वेटलिफ्टिंगच्या ५५ ​​किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदक जिंकले. बिंदियारानीने स्नॅचमध्ये ८६, तर क्लीन अँड जर्कमध्ये ११६ चा स्कोअर केला. म्हणजेच तिने एकूण २०२ किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले आहे.

वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर बिंदियारानी देवी खूप आनंदी दिसत होती. ती म्हणाली- मी पहिल्यांदा कॉमनवेल्थमध्ये खेळले आणि रौप्यपदक जिंकून मला खूप आनंद झाला. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरी होता. मात्र, माझ्या हातातून गोल्ड निसटले. व्यासपीठावर असताना मी केंद्रस्थानी नव्हते. पुढच्या वेळी आणखी चांगले करण्याचा प्रयत्न करेन.

विशेष बाब म्हणजे कॉमनवेल्थ २०२२ मध्ये भारताला आतापर्यंत चारही पदके वेटलिफ्टर्सनी मिळवून दिली आहेत. जिथे टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानूने ४९ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. दुसरीकडे संकेत महादेव आणि गुरुराजा पुजारी यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकण्यात यश मिळविले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा