लंडन, २१ जून २०२० : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांची परतीची तयारी सुरू झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे १३ मार्च नंतर कोणतेही सामने झाले नव्हते.
आता इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात ३ कसोटी सामन्यांची मालिका ८ जुलैपासून सुरू होणार आहे, परंतू आता क्रिकेट पूर्णपणे बदलले जाईल. इतर नियमांबरोबरच केवळ सहाय्यक कर्मचारी आणि खेळाडू मैदानावर असतील, फील्ड पंचांना सॅनिटायझर ठेवणे आवश्यक असेल.
९ जून रोजी वेस्ट इंडीजचा संघ इंग्लंडला पोहोचला. सर्व खेळाडू १४ दिवस ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे क्वारंटाईनमध्ये थांबले आहेत.
विंडीज ८, १६ आणि २४ जुलै रोजी इंग्लंडबरोबर तीन कसोटी सामने खेळणार आहे.
कोरोना पाठोपाठ बायो सिक्योर वातावरण, खेळात मॅन्युअलऐवजी इलेक्ट्रॉनिक स्कोअरबोर्ड असेल. खेळाचा आनंद साजरा करण्याचा मार्गही भिन्न असेल.पहिल्या सराव सत्रात मैदानावर बरेच लोक होते.
जेसन होल्डरच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजचा संघा इंग्लंड मध्ये दाखल झाला असून बाकीचा संघ पुढील प्रमाणे :
जर्मेन ब्लैकवुड, एनक्रुमाह बोनर, क्रैग ब्रैथवेट, शामर ब्रुक्स, जॉन कैम्पबेल, रोस्टन चेस, रहकीम कॉर्नवॉल, शेन डॉरिच (WK), चेमार धारक, शाई होप, अल्झारी जोसेफ, रेमन रायफर, केमर रोच.
न्यूज अनकट प्रतिनिधी