हिमनग टुटण्याचे कारण काय?

पुणे, ८ फेब्रुवरी २०२१: उत्तराखंडच्या चमोली येथे सात वर्षानंतर निसर्गाने पुन्हा एकदा कहर दाखवला आहे.  हिमनग फुटल्याने मोठा विध्वंस झालं आहे. चमोलीतील रेणी गावाजवळील हिमनग तुटल्याने दीडशेहून अधिक लोक वाहून गेले आहेत. हे सर्व लोक ऋषी गंगा पॉवर प्रकल्पात काम करत होते. धौली गंगा नदीत अचानक पाण्याचा वेग वाढल्यामुळे हे लोक बेपत्ता होण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर अनेक पूलही तुटलेले असून अनेक गावांमधील संपर्कही तुटला आहे.  अशा परिस्थितीत, हिमनग कसा तुटला आणि असे का होते हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे.
 सर्व प्रथम, हे काय आहे आणि हिमनग कसा तयार होतो ते जाणून घेऊया. खरं तर, पर्वतांच्या शिखरावर वर्षणू वर्षे बर्फ साठत राहतो. हा बर्फ साठून साठून त्याचा हिमनग तयार होतो. हिमनगाचे दोन प्रकार आहेत: अल्पाइन आणि आईस शिट. पर्वतांच्या शिखरावर तयार होणाऱ्या हिमनगाला अल्पाइन म्हणतात.
 तसे हिमनग तुटण्याचे अनेक कारणे आहेत, परंतु मुख्य कारण म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती. तर हिमनग तुटण्याचे दुसरे मोठे कारण म्हणजे हिमनगाच्या काठावर ताण पडणे आणि ग्लोबल वार्मिंग. ग्लोबल वार्मिंगमुळे हिमनगाचा बर्फ वेगाने वितळतो आणि त्यातील काही भाग तुटतो. जेव्हा हीमनगाचा (ग्लेशियरचा) एक मोठा तुकडा तुटतो तेव्हा त्याला काल्विंग म्हणतात.
 हिमनग तुटल्यानंतर त्यातील ड्रेनेज ब्लॉकमधील पाणी वाहण्यास सुरुवात होते आणि जेव्हा हिमनगातून पाणी वाहते तेव्हा बर्फ वितळण्याचे प्रमाण देखील वाढते. यामुळे त्याचा मार्ग मोठा होतो आणि पाण्याचा मोठा लोंढा तयार होतो. यामुळे नद्यांमधील पाण्याची पातळी अचानक खूप वाढते. नद्यांच्या प्रवाहालाही वेग येतो ज्यामुळे आजूबाजूच्या भागात मोठ्या प्रमाणात विनाश होतो.
लहान हिमनग सतत तुटत असतात, परंतु मोठा हिमनग दोन किंवा तीन वर्षांच्या फरकाने तुटतो, ज्याचा आधीच अंदाज करणे शक्य नाही. चमोली येथे हिमनग तुटल्यानंतर देवप्रयाग आणि सर्व नदीकाठावर असलेल्या लोकांना  सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा इशारा  दिला आहे. प्रशासन धोकादायक ठिकाणांहून लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात सतत व्यस्त आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा