मुंबई, १८ एप्रिल २०२३: यो यो हनी सिंग हा वादासाठी अनोळखी नाही आणि त्याच्या स्वत:च्या कारकिर्दीत खूप उलटसुलट प्रतिक्रियांचा सामना केल्यामुळे त्याला याचे दुष्परिणाम माहिती आहे. एका मुलाखतीत, रॅपरने इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेदच्या तिला पाहिजे ते परिधान करण्याच्या अधिकाराचे रक्षण केले. उर्फी ने परिधान केलेल्या कपड्यांवर आत्तापर्यंत चित्रपटसृष्टीतील लोकांप्रमाणेच राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली होती. परंतु बऱ्याच लोकांनी उर्फीचा विरोधात वक्तव्य केली आहेत. हनी सिंग मात्र तिच्या बाजूने बोलताना दिसला.
बिग बॉस ओटीटीमध्ये दिसल्यानंतर, उर्फीने तिच्या अनोख्या फॅशन निवडींसाठी काम करण्यास सुरुवात केली. तिने विविध वस्तूंपासून (DIY) पोशाख तयार करून स्वत: एक नाव कमावले, ज्यामुळे तिथे कौतुकही झाले आणि अनेकांनी तिला नावेही ठेवली. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत हनी सिंग म्हणाला, “एक उर्फी जावेद ही मुलगी आहे, ती बोल्ड कपडे घालते. लोक तिच्याबद्दल काहीही बोलतात. ती तिला पाहिजे ते घालू शकते. हे २०२३ आहे. आपल्याला नक्की होतं तरी काय?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
अश्लील गीते लिहिण्याच्या आरोपावर उत्तर देताना तो म्हणाला,” बॉलीवूडमध्ये दुहेरी गाण्यांचा मोठा इतिहास आहे. सोशल मीडियाच्या प्रगतीमुळे या प्रतिक्रियेला हातभार लागला आहे असं मला अजिबात वाटत नाही. पूर्वी लोक जास्त बुद्धीवादी होते. बुद्धिजीवी असणे आणि सुशिक्षित असणे यात फरक आहे. आज आपण दोन्ही एकत्र करत आहोत आणि सुशिक्षित म्हणत आहोत. लोक पूर्वी अधिक व्यापक विचारसरणीचे होते, ते मनोरंजनाकडे मनोरंजन म्हणून पाहत असत. आजकाल मात्र अस होत नाही.”
अलीकडेच जेव्हा उर्फीने दिग्गज डिझायनर्स अबू जानी आणि संदीप खोसला यांच्यासाठी रॅम्प वॉक केला तेव्हा उर्फीला वैधतेचा शॉट देण्यात आला. तिला ऑनलाइन रिटेल ब्रँड अजिओसोबत सहयोग म्हणूनही घोषित करण्यात आले.. पण तरीही, उर्फीची तिच्या फॅशनच्या निवडीबद्दल ऑनलाइन थट्टा केली जाते. अभिनेता रणबीर कपूरने अलीकडेच तो उर्फीचा कपड्यांचा चाहता नसून तिची कपड्यांची निवड वाईट आहे असं एका इंटरव्यू मध्ये सांगितलं. पण करिनाने न्यूज चैनलच्या मुलाखतीत,” तिला हवं तसं ती करते, हीच फॅशन आहे-जेव्हा तुम्ही तुमचा इच्छेप्रमाणे काम करतात तेव्हाच तुमचा आत्मविश्वास वाढतो”, असे म्हणत उर्फी चे कौतुक केले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी:- ऋतुजा पंढरपुरे
