काय आहे बर्ड फ्ल्यू? कशी घ्याल दक्षता…

पुणे, ७ जानेवारी २०२१: भारताला आधीच कोरोनाने जखडलेले असताना आता आणखी एक आजराच्या संकटाला देशाला सामोरे जावे लागत आहे आणि तो म्हणजे बर्ड फ्लू. भारतातील बहुतांश राज्यांमधे बर्ड फ्ल्यू आजाराने चांगलंच डोकं वर काढलं आहे. ही परिस्थिती इतकी भयावह होत चालली आहे की, काही राज्यात पक्ष्यांची कत्तल करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत.

केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यात हजारो पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. H5N8 व्हायरस परत आल्याचे केरळने जाहीर केले आहे. तर हिमाचल प्रदेश मधे ही या विषाणुने शिरकाव केला आहे. त्यामुळे त्या राज्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बर्ड फ्ल्यू काय आहे? हा प्राणघातक आहे का?

बर्ड फ्ल्यू किंवा एव्हीयन इन्फ्लूएन्झा हा एक व्हायरल इन्फेक्शन आहे. जो पक्ष्यांमधून पक्ष्यांमधे पसरतो. जेव्हा बर्ड फ्ल्यूची मानवी जीवांना लागण होते तेव्हा तो जीवघेणा ठरतो. बर्ड फ्ल्यूची माणसांना पक्ष्यांच्या संपर्कात आल्यानंतर लागण होते. तर जागतिक आरोग्य संघटनेनुसार १९९७ मधे H5N1 चा पहीला रूग्ण आढळून आला होता. बर्ड फ्ल्यूची ज्यांना लागण झाली, त्यातील ६०% लोकांचा बळी गेला आहे. जगभरात २००३ ते २०१९ पर्यंत जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार H5N1 ची एकूण ८६१ मानवी प्रकरणे समोर आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यातील ४५५ जणांचा मृत्यू झाला आहे.

बर्ड फ्लूची लक्षणे….

संसर्ग झाल्याच्या दोन ते तीन दिवसांपासून लक्षणे दिसून येतात. लक्षणे अश्याप्रकाराची आहेत.

खोकला
ताप
घसा खवखवणे
स्नायू दुखणे
डोकेदुखी
श्वास लागणे
क्वचितांना डोळ्याचा सौम्य संसर्ग होतो.

उपाय….

बदक कोंबड्या आणि इतर पक्षी जे प्रभावित क्षेत्राच्या एक किलोमीटर परिसरात आल्यास त्यांना मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच केंद्र सरकारने ही सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

केरळमधे ४८ हाजार पक्ष्यांना मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोट्टायम आणि अलाप्पुझा जिल्हातील प्रभावित क्षेत्राच्या एक किलोमीटर परिसरात हे आदेश देण्यात आले आहेत. तर H5H1 व्हायरसचा प्रसार तपासणीसाठी आहे.

अश्या वेळी मांसाहार खवय्यांच्या खाण्याला कुठेतरी आळा बसतो. पण बर्ड फ्ल्यूची भिती न बाळगता कुक्कुटपालनातील चिकन आणि अंडी खाऊ शकता. हा व्हायरस ७० अंश सेल्ससिअस तापमानावर ३० मिनटात नष्ट होतो.

यावर लस आहे का?

एव्हियन फ्लू किंवा बर्ड फ्ल्यूचा मानवाला संसर्ग झाल्यास, त्यावर कोणतीही लस नाही.

इशारा….

जर तुम्हाला मृत किंवा मरत असलेला पक्षी आढळला तर कोणत्याही परिस्थितीत त्याला स्पर्श करू नका. यामुळे व्हायरसचा संसर्ग होण्याची शक्यता असते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा