मणिपूर हिंसाचारचं नक्की कारण काय ?

7

मणिपूर ९ मे २०२३ : मणिपूर मधल्या हिंसाचाराची परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही. हिंसाचारात आतापर्यंत मणिपूरमध्ये ६० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत झालेल्या हिंसाचारात १७०० घरं पेटवण्यात आली आहेत.मणिपूर हिंसाचारचं नक्की कारण काय हे समजून घेऊया.

मणिपूरमध्ये मैतेई, नागा आणि कुकी समाजाचे लोकं राहतात. मणिपूर राज्याची लोकसंख्या २७,२१,७५५ इतकी आहे. मैतेई समाज हा हिंदू समुदाय आहे. लोकसंख्येत मैतेई समाजाच्या नागरिकांचं प्रमाण सर्वाधिक आहे. जो राज्याच्या राजधानी शहर इंफाळमध्ये स्थित आहे. २०११ च्या जनगणनेनुसार राज्याच्या ३.५ दशलक्ष लोकसंख्येपैकी ५० टक्क्यांहून अधिक आहे. नागा आणि कुकी जमाती हे ख्रिश्चन आहेत. या समाजाची लोकसंख्या ४० टक्के आहे. त्यांना “अनुसूचित जमाती” दर्जा प्राप्त आहे, ज्यामुळे त्यांना टेकड्या आणि जंगलांमध्ये जमिनीचा मालकी हक्क मिळतो.

मणिपूरमध्ये जास्तीत जास्त लोकं हे मैतेई समाजाचे आहेत. मैतेई समुदायला एसटीमध्ये दाखल व्हायचं होतं. त्यानंतर मेतई जमातीच्या लोकांना मणिपूर उच्च न्यायालयाने १९ एप्रिल रोजी अनुसूचित जमाती मध्ये समाविष्ट करण्यात आले. पण मणिपूर उच्च न्यायालयाच्या ह्या निर्णयाला नागा अणि कुकी समुदायातील लोकांनी आपला विरोध दर्शवला. विरोध करणाऱ्या समाजाचं म्हणणं आहे की मैतेई समुदायाला आधीच एससी आणि ओबीसी बरोबर आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाचं आरक्षण मिळालं आहे. अशात मैतेई समाजाला सगळंच मिळू शकत नाही ते आदिवासी नाहीत ते एससी, ओबीसी आणि ब्राह्मण आहेत म्हणुन नागा अणि कुकी समुदायातील लोकांकडुन मैतई समुदायातील लोकांच्या मागणी विरूद्ध विरोध दर्शविण्यासाठी आंदोलन केले जात आहे.

मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह म्हणाले की, जे लोक अजूनही हिंसाचारग्रस्त भागात अडकले आहेत, त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी कबूल केले की अशा ठिकाणी अजूनही १०,००० लोक अडकले आहेत. यासोबतच बिरेन सिंह म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पहिल्या दिवसापासून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी हिंसाचारात बाधित कुटुंबांना भरपाई जाहीर केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : आचल सूर्यवंशी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा