अंगावरून पांढरे पाणी जाणं म्हणजे काय? हे आहेत उपाय

पुणे, २९ नोव्हेंबर २०२०: महिलांना अनेक आरोग्य विषयक शारीरिक व्याधी जाणवतात त्यापैकीच एक म्हणजे अंगावरून पांढरे पाणी जाणे. अनेक महिलांमध्ये पांढऱ्या स्त्रावाची समस्या जाणवते. या समस्येमधे योनी मधून एक चिकट पांढरा स्त्राव होतो ज्याचा वास ही येतो. याला ल्युकोरीया म्हणतात. हा कमी प्रमाणात आणि कमी काळ आसेल तर ठिक आहे. पण जास्त वेळ आणि जास्त काळ असं होत आसेल तर मग ही एक गंभीर बाब बनते. हा एक प्रकाराचा आजारच आहे यासाठी महिलांनी अंतर्गत जागेच्या स्वच्छतेची काळजी घेणं गरजेचं आहे.

घरगुती उपाय….

१०० ग्रॅम भेंडी आणि अर्धा लिटर पाणी घ्या, त्या नंतर पाणी निम्मं होईपर्यंत भेंडी पाण्यात उकळा व पाणी थंड झाल्यावर त्यात थोडं मध टाकून प्यावं.

आवळा पावडरमधे मध मिसळा आणि दिवसातून दोन वेळा घ्या. यांच्यानंतर पांढरा स्त्राव कमी होण्यास मदत होईल.

चार अंजीर रात्री भिजवा, सकाळी रिकाम्या पोटी खा. यांवर पाणी प्या. हा उपाय नियमित केल्यास समस्या दूर होईल.

गुलाबाच्या पाकळ्या वापरून औषध बनवा. गुलाबाची पानं सुकवून त्याची पावडर तयार करा आणि नियमित रोज गरम दुधात मिसळून प्या. जेव्हा पांढरा स्त्रावाचा आजार होतो तेव्हा गुलाबाचे पान उत्तम औषध म्हणून काम करते.

नियमितपणे १ ग्लास दुध आणि केळी व त्यात अर्धा चमचा तुप घालून सेवन केल्यास पांढरा स्त्राव काही दिवसात कमी होतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा