…काय सांगतोय अर्थसंकल्प

8

नवी दिल्ली, दि. १६ मे २०२०: देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलं आणि त्याची दोन टप्प्यात माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

सीतारामन यांनी अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी, शेती, पशूपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स व्यवसायाबाबत पॅकेज जाहीर केले. शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचं पॅकेज देण्यात आल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. खाद्य पदार्शांशी संबंधित उद्योगांना १० हजार कोटींची मदतही जाहीर करण्यात आली आहे असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले

इतर महत्त्वाच्या घोषणा :

औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी ४ हजार कोटींची मदत

पशुपालन आणि दुग्ध व्यवसायसाठी १५ हजार कोटींची तरतूद

पाळीव प्राण्यांच्या लसीकरणासाठी १३ हजार ३४३ कोटींची तरतूद

मत्स्य व्यवसायासाठी २० हजार कोटींची तरतूद

अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी १० हजार कोटींची तरतूद

मधमाशी पालन व्यवसायासाठी ५०० कोटींची तरतूद

भाजीपाला वाहतुकीवर ५० टक्के सबसिडी

लॉकडाउनच्या काळात भाजीपाला पुरवठ्यासाठी ‘ऑपरेशन ग्रीन’

आज ११ घोषणा करण्यात आल्या. ज्यापैकी ८ कृषी क्षेत्राशी होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केलं आहे. यात कोणत्या क्षेत्राला काय मिळाले याच्या घोषणा तीन दिवस करण्यात येत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेचा आजचा तिसरा दिवस आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा