देशातील देवस्थाने व धार्मिक ट्रस्ट त्यांच्याकडील पैसे, सोने हे त्या धार्मिक ट्रस्टच्या निगराणीखाली असतात. कोणत्याही धर्माच्या जरी या ट्रस्ट असल्या तरी त्यामध्ये देणगी रुपाने येणारा पैसा, सोने,जड जवाहर त्या त्या धर्मातील लोकांनी दिलेला असतो. किंबहुना धर्माविषयी श्रद्धा असल्याने भक्तिभावाने ते त्या ट्रस्ट किंवा देवस्थानाच्या चरणी अर्पण करतात. आज पर्यंत किती भक्त जणांनी दीलेल्या देणगीचा हिशोब मागितला असेल तर तो नाही असाच असेल (अहवाल ट्रस्ट प्रकाशित करतात तो भाग वेगळा) कारण त्यामागील त्याची भक्ती श्रद्धा व धर्मावरील विश्वास हेच महत्त्वाचे कारण असते. देणाऱ्या देणगीचा चा कुठेही गैरवापर होणार नाही या बद्दल थोडीशी शंका मनात नसते
धार्मिक ट्रस्ट व त्यांच्याकडील सोने या विषयाला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेऊन ऐरणीवर आणला. वर्ल्ड गोल्ड कौन्सिल या जागतिक संघटनेने दिलेल्या आकडेवारीनुसार देशातील विविध धार्मिक ट्रस्टमध्ये जवळपास एक ट्रिलियन डॉलर म्हणजे जवळपास ७५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने पडून आहे १९९८ साली भारताचे तत्कालीन पंतप्रधान मा.अटल बिहारी वाजपेयी यांनी `गोल्ड डिपॉझिट स्कीम` राबवली होती. त्या वेळी देशातील विविध ट्रस्ट ने २० टन सोने देशातील ११ बँकेत १४ टक्के दराने डिपॉझिट केले गेले होते. सांगण्याचे तात्पर्य इतकेच की इतक्या मोठ्या प्रमाणावर सोने असताना कोरोनाच्या साथीने देश आर्थिक संकटातून जात असताना देशातील सर्व जाती-धर्माच्या धार्मिकट्रस्टने प्रश्न मन मोठे करावे त्याहीपेक्षा पुढे जाऊन स्वतःहून पुढे यावे पण आज देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान तिरुपती बालाजी विश्वस्तांनी तेराशे कामगारांना कमी केले आहे कारण देणगीचा स्त्रोत व त्यांचे कंत्राटी पद्धतीचे कॉन्ट्रॅक्ट संपले या कारणाने. औरंगाबाद खंडपीठाने हा निर्णय दिला आहे की कामगारांना कमी करू नका व त्यांचे मासिक वेतन द्यावे जर धार्मिक ट्रस्टने ह्या वेळेला असा काही निर्णय घेणार असतील तर या गोष्टी चा जनमानसावर विपरीत संदेश जाण्याचा धोका आहे.
यावेळेला जर गजानन महाराज, स्वामी समर्थ, साईबाबा, बाळूमामा, गोंदवलेकर महाराज, सेवागिरी महाराज इत्यादी जर हयात असते तर काय केले असते हे सांगण्याची गरजच नाही.पण महंत अनिकेत शास्त्री महाराज यांनी सोन्याचा विषय निघाल्यावर ज्यांनी मागणी केली त्या श्री पृथ्वीराज चव्हाण यांचा जाहीर निषेध केला, पण पृथ्वीराज चव्हाण यांनी तर दिलेल्या सोन्यावर १ ते २ टक्के व्याज द्यावे हेही सुचवले होते. म्हणजे ते फुकट द्या म्हणत नव्हते, तर मग निषेध करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. याउलट धार्मिक संस्था कोणत्याही धर्माच्या असो तर सरकारने या ट्रस्ट कडून सर्व सोने-नाणे जाड जवाहर स्वतःकडे जप्त करून ० टक्के व्याजदर द्यावे व पाच वर्षांनी त्यांना परत द्यावे.शेवटी जी देणगी दिली आहे ती भाविकांनी दिले आहे आपल्या स्वतःच्या घरात अडचण असेल तर आपल्याकडील सोने आपण बँकेकडे गहाण ठेवतोच व यथावकाश ते नंतर सोडवून घेतो मग देश म्हणजे आपले कुटुंबच न्हवे का? मग आपण हात का आखडता घेत आहात.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे चुकले काय त्यांचा निषेध करण्यासारखं….
अशोक कांबळे