कसे असेल पुढील चार दिवसांचे हवामान

नवी दिल्ली, ३१ ऑगस्ट २०२०: ३१ ऑगस्ट (पहिला दिवस): पश्चिम राजस्थान, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्किम, आसाम आणि मेघालय , सौराष्ट्र आणि कच्छ येथे तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति -मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पंजाब, पूर्व राजस्थान, ओडिशा , अंदमान आणि निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा, गुजरात प्रदेश, कोकण आणि गोवा, आंध्र प्रदेश किनारपट्टी आणि यानम, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल आणि केरळ आणि माहे मध्ये तुरळक ठिकाणी अति-मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

१ सप्टेंबर (दुसरा दिवस ): नैऋत्य अरबी समुद्रावर जोरदार वारे (ताशी ४५-५५ किमी वेग) वाहण्याची शक्यता आहे. दक्षिण अंदमान समुद्रावर आणि लगतच्या विषुववृत्तीय हिंद महासागरावरील भागात (वेग ४०-५० किमी प्रतितास ) वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. मच्छीमारांना या भागात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे.

२ सप्टेंबर ( तिसरा दिवस): पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली, राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, बिहार, झारखंड, आंध्र प्रदेश किनारपट्टी आणि यानम, तेलंगणा ,रायलसीमा, दक्षिण कर्नाटक आणि किनारपट्टी, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल आणि केरळ आणि माहे.मध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह वादळ येण्याची शक्यता आहे.

नैऋत्य अरबी समुद्रात वादळी वारे (४५-५५ किमी प्रतितास वेगाने जाणारा वेग).वाहण्याची शक्यता आहे. नैऋत्य अरबी समुद्रावर आणि केरळ व लक्षद्वीपच्या किनाऱ्यालगत वादळी वारे (वेग ४०-५० किमी प्रतितास) वाहतील. मच्छीमारांना या भागात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे.

३ सप्टेंबर (चौथा दिवस): दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि केरळ आणि माहे येथे तुरळक तितकी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली, पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे, ओडिशा , मध्य महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टी आणि तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल येथे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मच्छीमारांना या भागात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे.

४ सप्टेंबर (पाचवा दिवस): हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, आसाम आणि मेघालय, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल आणि केरळ आणि माहे येथे तुरळक ठिकाणी अति-मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मच्छीमारांना या भागात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा