निवडणूक कोणतीही असो मी कायम सावध असतो, आ. बाळासाहेब पाटील यांचे सुचक वक्तव्य

7

सातारा, १७ सप्टेंबर २०२२ : आगामी होणाऱ्या बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी वृत्तवाहिनी माध्यमांशी बोलताना सुचक वक्तव्य केल आहे, ते म्हणतात निवडणूक कोणतीही असो, मी कायम सावध असतो. मला लगेच कळतं पुढे काय होणार आहे, त्यामुळे मी सावध असतो.

बाजार समितीच्या निवडणूकीसाठी तुमची तयारी कशाप्रकारे चालू आहे ? असा प्रश्न माध्यमांनी विचारल्यावर आमदार पाटील बोलतात, कोणतीही निवडणूक आली की मी कायम सावध असतो. आता लम्पी आला आहे. मी लगेच बैठक घेऊन त्या संदर्भात सगळ्या सूचना केल्या. मी प्रत्येक विषय गांभीर्याने घेत असतो. त्यामुळे निवडणुका लागेल त्यावेळी आपण बघू मी नेहमीच सावध आहे.

तसेच बाजार समितीच्या निवडणुकाबाबत आमदार पाटील बोलतात सोसायटीचे निवडणुका झाल्यानंतर बाजार समितीच्या निवडणूक घेतल्या पाहिजे. पण असा निर्णय पूर्वी घेण्यात आला होता, सध्या सोसायटीच्या निवडणुका या पूर्ण झाले आहेत. निवडणूक प्राधिकरण जुन्या प्रमाणे आम्ही याद्या गोळा करत आहोत. असे सांगत आम्ही निवडणुकांची तयारी करत आहोत, असेही जाहीर केलं आहे.

बाजार समिती निवडणूक मध्ये शेतकऱ्यांना अधिकार मिळू शकतो का ?

या प्रश्नावर आमदार बाळासाहेब पाटील बोलतात की,

गेल्या अधिवेशनात शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा जुना भारतीय जनता पार्टीचा निर्णय पुन्हा मांडून त्यांचा कायदा केला. पण, त्यावर राज्यपालांची स्वाक्षरी झालेली नाही. शेतकऱ्यांतून मतदान होऊन बाजार समितींना निवडणुका या परवडणार नाहीत. तसं तर शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे आणि काही शेतकऱ्यांना दोन ठिकाणी शेती आहे. त्यांना मतदानाचा अधिकार कुठे द्यायचा हा नेमका मोठा प्रश्न आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता जी यादी होणार आहे, त्यानुसार ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, हमाल, मापाडी यांच्यातून निवडणुका होतील. पण सरकारने जर ठरवलं तर शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळू शकतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा