व्हाट्सअप च्या माध्यमातून इस्रायली स्पायवेअर चा हल्ला.

न्यूयॉर्क: व्हाट्सअप या संदर्भात इस्रायली हेरगिरी करणारी कंपनी एन एस ओ ग्रुप विरोधात खटला भरला असून या संस्थेनेच हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या स्पायवेअर च्या माध्यमातून चौदाशे युजर्स वर पाळत ठेवण्यात आल्याचे उघड झाले आहे. पेंगासस या स्पायवेअर माध्यमातून ही हेरगिरी करण्यात आली. जगभरातील वीस देशांमधील चौदाशे पेक्षाही अधिक लोकांना या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लक्ष करण्यात आले. दरम्यान भारतामध्ये नेमक्या किती जणांना या हेरगिरीचा फटका बसला ते मात्र व्हाट्सअप ने जाहीर केलेले नाही.
या हल्ल्याच्या विरोधात अमेरिकेतील काही मानवाधिकार कार्यकर्त्यांनी तेथील न्यायालयामध्ये धाव घेतली असून या स्पायवेअर ची जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एन एस ओ ग्रुप आणि क्यू सायबर टेक्नॉलॉजी या कंपन्यांविरोधात आता खटले बनवले जाऊ शकतात.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा