एसटी बस नादुरुस्त झाल्याने, चालकाने महिला कंडक्टरला दोरीच्या साहाय्याने अक्सिलेटर कमी जास्त करायला लावत, पार केले ४० कीमी अंतर

सांगली,२७ मे २०२३ : एसटी बस नादुरुस्त झाल्यानंतर बस चालकाने शक्कल लढवली. चालकाने महिला कंडक्टरला दोरीच्या साहाय्याने अक्सिलेटर कमी जास्त करायला लावत, ४० कीमी अंतर पार केलेआहे. एसटीच्या चालकाने महिला कंडक्टरच्या साहाय्याने बस आगारात कशी आणली याचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला आहे. अक्सिलेटर खराब झालेल्या बसमुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून नाईलासत्व वाहकाने ही शक्कल लढवल्याचे समोर येत आहे. या घटनेतील चालकाचे मात्र सर्वत्र कौतुक होत आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या काही गाड्या अजून खराब स्थितीत आहेत, त्याचबरोबर राज्य सरकार कडून त्याच गाड्या चालवल्या जात असल्याचा आरोप प्रवाशी करत आहेत.बसचे अक्सिलेटर खराब झाल्यानंतर चालकाने महिला कंडक्टरच्या हातात अक्सिलेटर बांधून दोरी दिली. महिला कंडक्टर ती दोरी कमी जास्त करत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. ही बस आगारापर्यंत दोघांनी कशीबशी नेली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

कवठेमहांकाळ ते घाटनांद्रे या मार्गावरील बसमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.बस चालकाने हातात स्टेअरिंग ठेवत अक्सिलेटरला दोरी बांधली आणि ती दोरी महिला कंडक्टरकडच्या हातात देत एक्सलेटर कमी जास्त करायला लावून बस कशीबशी आगारात आणली. यामुळे महामंडळाच्या नादुरुस्त एसटी बसेसचा मुद्या पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सोशल मीडियावर या बसमधील अनेक व्हिडीओ फिरत आहेत.परंतु अशावेळी एखादी घटना घडली असती तर याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक करीत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा