पुणे, २७ एप्रिल २०२१: भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजल्याचं चित्र दिसत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत तुम्हाला मदत करणाऱ्या काही टिप्स आम्ही आज देणार आहोत. ज्यामुळं तुम्ही सुरक्षिता बरोबरच सतर्क देखील रहा.
टेस्ट कधी करावी?
लक्षणं आसल्यावर :
आपण ताप, अंग दुखी, वास आणि चव न येणं, थंडी वाजून येणं आणि धाप लागणं यासारखी सामान्य चिन्हं अनुभवत आसल्यास. नवीन लक्षण्यांमधे गुलाबी डोळे, लुझ मोशन आणि कमी ऐकण्यास येणं यांचा समावेश आहे.
जवळचा संपर्क :
जर आपण पाॅजिटिव्ह पेशंटच्या जवळ ६ फुटाच्या कमी अंतरावर १५ मिनिटं आसल्यास तर टेस्ट करून घेणं योग्य ठरते.
टेस्ट कोणी करू नये?
पुर्ण लस घेतलेले लोक :
जर लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर २ आठवडे उलटून गेले आणि लक्षणे नसतील तर कोविड रूग्णांच्या संपर्कात आल्यानंतर तपासणीची आवश्यकता नसते.
कोणती टेस्ट केली पाहिजे ?
RT – PCR ही गोल्ड सँडर्ड आहे :
रॅपिड अँटीजेन टेस्ट (RAT) ही स्पाॅट रिपोर्ट देते. जर RAT रिपोर्ट पाॅजिटिव्ह आल्यास कोवीड झाले हे कन्फर्म असते. मात्र RAT ही निगेटिव्ह आली आणा आणि लक्षणे आसल्यास RT – PCR टेस्ट नक्की करा.
CT व्हॅलू आणि CT स्कोअर….
RT – PCR मधील CT व्हॅलू म्हणजे सायकल थ्रेशोल्ड व्हॅलू जे रूग्णांमधे व्हायरल लोडचे लक्षण आहे.CT मुल्य जितके कमी, तितके संक्रमण जास्त आसते.
डाॅक्टर हे काही पेशेंटना छातीचे CT स्कॅन करण्यास सांगतात. येथे सीटी स्कोअर जितका जास्त असेल तितकाच संसर्गाची तीव्रता देखील जास्त असेल.
कोविड १९ चे टप्पे….
पहिला टप्पा : होम क्वांरनटाइन किंवा आयसोलेशन वार्ड…..
एसीम्प्टोमॅटिक :
कोणत्याही मेडिकल साइनशिवाय आणि छातीचे स्कॅन करणे सामन्य आहे.
परिस्थिती :
सौम्य ताप,थकवा,मायल्जिया,खोकला,घसा खवखवणे,नाक वाहणे,शिंका येणे,मळमळ,उलट्या होणे,पोटदुखी किंवा अतिसार.
दुसरा टप्पा (अ) : आयसोलेशन वार्ड/हाॅस्पिटल/आयसीयू
परिस्थिती :
मध्यम मात्र सतत असलेल्या ताप आणि खोकला.
दुसरा टप्पा (ब) :
परिस्थिती :
एसपीओ २ सह गंभीर न्यूमोनिया.
तिसरा टप्पा : आयसीयू
परिस्थिती :
गंभीर, तीव्र श्वसन त्रासाचा सिड्रोम, शाॅक, कोरोनरी हार्ट फेल्युअर, मुत्रपिंडाचे तीव्र नुकसान.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव