नर्स भरती कधी होणार?

लातर, २१ जून २०२० : DMER कडून नोंदणीकृत नर्सेसच्या भरतीसाठी स्पर्धा परीक्षा घेतली जाते. या परीक्षेच्या गुणवत्ता यादीनुसार सरकारी हॉस्पिटल्समध्ये त्यांना संधी दिली जाते. पण ही गुणवत्ता यादी वर्षभरासाठीच पात्र धरली जाते.२०१७ नंतर DMER कडून सरकारी हॉस्पिटल्समध्ये भरती करुन घेण्यात आलेली नाही.

DMER कडूनही आम्ही भरती सुरू करणार आहोत. त्यासाठी निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. सरकारची अंतिम मंजुरी घेतली जाईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.शिवाय, कोविडच्या उपचारासाठीही पात्र नर्सेसची नोंदणी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

लातूरला राहणाऱ्या शिल्पा सूर्यवंशी यांनी २०१५ ला नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केले. सध्या त्या गावाकडे एका खासगी रुग्णालयात तुटपुंज्या पगारात काम करतात. कोरोना रुग्णांसाठी आता सरकारी हॉस्पिटल्समध्ये नर्सेसची गरज आहे. पण आमच्याऐवजी बाहेरुन परिचारिका आणल्या जात आहेत. त्यांना संधी दिली जात आहे. सरकारने आम्हाला आधी नोकरी द्यावी असं शिल्पा यांनी मत व्यक्त केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही डॉक्टर, नर्सेस यांना कामावर रूजू होण्याचे जाहीर आवाहन केले होते. तसेच खासगी आणि प्रॅक्टीस न करणाऱ्यांनाही कामासाठी हजर राहण्याचे आवाहन केले होते. सरकारला मनुष्यबळाची आवश्यकता आहे हे यातून अनेकदा स्पष्ट झाले आहे. असे असताना महाराष्ट्रात पात्र परिचारिकांना रूजू करुन का घेतले जात नाही? हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा