प्रचारसभेत भाषण करत असताना गुजरातचे मुख्यमंत्री स्टेजवर कोसळले

वडोदरा, १५ फेब्रुवरी २०२१: सध्या गुजरातमध्ये काही शहरांच्या महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे येथे राजकीय वातावरण तापलेले आहे. यामुळे वडोदरा महानगरपालिकेच्या निवडणुका सुरु आहेत. यासाठी जोराने प्रचारसभा सुरू आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी प्रचारसभेत भाषण करत असताना चक्कर येऊन मंचावर कोसळले.

गुजरात मध्ये निवडणुकींच्या पर्शभुमिवर वेगवेगळ्या पक्षांकडून जोरदार प्रचार मोहिमा राबवल्या जात आहेत. भाजपकडूनसुद्धा येथे जोरदार प्रचार सुरु आहे. भाजपतर्फे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची भाषणे आयोजित केली जात आहेत. वडोदरा येथील निजामपुरा भागात त्यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती.

वडोदरा येथील निजामपुरा भागात त्यांची प्रचारसभा सुरू असताना ते मंचावर भाषण करत होते. त्यांचा रक्त दाब कमी झाल्याने भाषण दरम्यान त्यांना चक्कर आली व ते झाली कोसळले. घडलेला सर्व प्रकार सीसी टिव्ही मध्ये रेकॉर्ड झाला आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा