सातारा, २९ ऑगस्ट २०२२: सातारा नगरपालिकेच्या नुतन इमारतीचा पाया जेसीबीच्या सहाय्याने खोदताना तब्बल एक हजार ब्रिटिशकालीन रायफलच्या गोळ्या, दस्ता, मॅगझिनचा मोठा साठा सापडला आहे. घटनास्थळी पोलीसांनी धाव घेत सर्व साठा ताब्यात घेतला आहे.
हा साठा लवकरच छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. सातारा येथील केसरकर पेठेतील नगरपालिकेची इमारत प्रशासकिय कामकाजासाठी कमी पडू लागल्याने जिल्हा परिषदेसमोर नगरपालिकेच्या जागेत नवीन इमारतीचे काम सूरु केले.
या ठिकाणच्या जागेची साफसपाई करुन जेसीबीच्या सहाय्याने पाया खोदण्याचे काम सूरु आहे. हे काम सुरु असताना पुरातन काळातील रायफलींच्या गोळ्या, दस्ता, मॅगझिनचा मोठा साठा सापडला. काही क्षणातच लोकांची गर्दी जमा झाली. ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पुरातत्व विभागालाही याबाबत कल्पना देण्यात आली. आता हा सर्व साठा पोलिसांच्या ताब्यात आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर