शेअर बाजार गडगडला

मुंबई, २९ ऑगस्ट २०२२:आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची सुरवात खराब झाली. सोमवारी सेन्सेक्स सुमारे १४६६ अंकांनी घसरला. त्याच वेळी, नीफ्टी उघडताच ३७० अंकांनी घसरला. अमेरिकन शेअर बाजारात आलेल्या सूनामीचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावरही दिसून येत आहे. सेन्सेक्स मध्ये कोणताही स्टॉक हिरव्या चिन्हावर नव्हता. शेअर बाजार उघडताच एकच गोंधळ उडाला. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

हिंदुस्तान युनिलिव्हर वगळता उर्वरित शेअर्स लाल चीन्हात ट्रेडिंग करत आहेत. त्याच वेळी, आयटी शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. निफ्टी आयटी ३.८५ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. सकाळी ९.४० वाजेपर्यंत सेन्सेक्स टेक ,महिंद्रा इन्फोसिस, एचसीएल टेक आणि टीसीएस सर्वात जास्त घसरले. याशिवाय इतर सर्व शेत्रिय इंडेक्स लाल चीन्हात दिसत आहे.

बँक निफ्टी मध्येही दोन टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. तर पीएसयू बँक निर्देशांकात २.५१ टक्के नी मेटल मध्ये २.४४ टक्क्यांची घसरण झाली आहे. निफ्टीतील स्मॉल कॅप १००, निफ्टी मिड कॅप १०० निर्देशांकात दोन टक्कयांची घसरण दिसून आली. निफ्टी आयटी, सार्वजनिक शेत्रातील बँक, रियालिटी या सेक्तर्मध्ये घसरण झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सूरज गायकवाड.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा