गोल पोस्ट स्पॉटलाइट “मी कपडे बदलत आसताना ते आत आले आणि मला ओरबाडू लागले”…

“मी कपडे बदलत आसताना ते आत आले आणि मला ओरबाडू लागले”…

मुंबई, २३ नोव्हेंबर २०२०: बाॅलिवूड चित्रपट सृष्टी मधे अनेक कलाकार स्ट्रगल करतात मात्र या मधे फार कमी लोकांना प्रसिद्धी मिळते. नाहीतरी मग अनेक सिने कलाकार अथवा तारका हे या ग्लॅमर जगाचे शिकार होतात. जे फार कमी प्रमाणात सर्वसामान्यां पर्यंत पोहचते. पण, अनेक वेळा अनेक मोठ मोठ्या कलाकारांनी त्यांच्या वर झालेल्या प्रकरणावर स्वतहा पुढे येत माहिती दिली आहे. “कास्टींग काऊच” आणि नंतर “मी टू”अश्या माध्यमातून कलाकारांनी आपबीती परिस्थिती सांगितली आहे.

इराणीयन-भारतीय अभिनेत्री मंदना करीमी emailने निर्माते महेंद्र धारिवालांवर गैरवर्तन चा आरोप केला आहे. “शूटिंग नंतर धारिवालांनी मला थांबाण्याची विनंती केली. पण, मला थांबणं शक्य नव्हतं कारण माझी एक मिटींग होती. नंतर मी व्हॅनिटीत जाऊन कपडे बदलू लागले. तेव्हढ्यात धारिवाल आत आले आणि माझ्या अंगावर ओरबाडू लागले”. असा धक्कादायक खुलासा मंदनानं केला आहे. तर धारिवाल यांनी मी व्हॅनिटीत जाण्यापूर्वी दरवाजा वाजवला होता आसा दावा देखील केला आहे.

बाॅलिवूड चित्रपट सृष्टी मधे अनेक अभिनेत्री बाबतीत असे प्रकार घडले आहेत. याआधी देखील पायल घोष या अभिनेत्रीने देखील तिच्या वर बलात्कार झाल्याची माहिती प्रसार माध्यमांना देत दिग्दर्शक अनुराग कश्यप वर तिने आरोप केले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version