गोल पोस्ट राष्ट्रीय रात्रभर त्याला तुडवला सकाळी तो त्यांचा जावाई झाला… .

रात्रभर त्याला तुडवला सकाळी तो त्यांचा जावाई झाला… .

रामपूर, २३ नोव्हेंबर २०२०: प्रेमात कोणी काहीही करू शकते प्रेम ज्याला होते तो जगापेक्षा जरा वेगळा विश्वात वावरत आसतो. कारण, आता त्याच्या सोबतीला हळूच कुणीतरी येऊन एका प्रेमाची फुंकर घालत असते. जिच्या साठी तो काहीही करू शकतो आणि अशा अनेक कथा, गोष्टी आणि चित्रपट आपण पाहीलेत. पण, प्रेमीयुगुलांच्या बाबतीत नेहमीच काहीना काही विचित्र घटना घडत आसतात.

प्रेमात अनेक वेळा तुम्ही प्रेयसीला भेटायला गुपचूप गेलाच असाल, भेट व्यवस्थित पार पडली तर ठिक आणि तुमच्या प्रेयसीच्या कुटुंबाला माहिती पडलं तर?….असाच एक प्रकार घडलाय उत्तर प्रदेशच्या रामपूरमधे, मध्यरात्री एक तरुण आपल्या प्रेयसीला भेटायला गेला आणि तिथंच कुटुंबाचा मार खाल्ला. मार खाण्यापर्यंत ठिक होतं पण, नंतर तोच सकाळी त्या कुटुंबाचा जावई देखील झाला.

मध्यरात्री मुलीला भेटायला आलेल्या मुलाला मुलीच्या कुटुंबियांनी रात्रभर तुडवला आणि सकाळी त्या प्रियकराला पोलीसांच्या स्वाधीन केलं. पण, पोलीस केसची काही लचांड मागं नको म्हणून काहींनी तडजोड घडवून आणली आणि त्या प्रियकराचं लग्न मुलीशी लावून दिलं.

हा विषय रामपूरच्या अलीमनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मेहंदी नगर सुमाली खेड्याचा असल्याचं सांगण्यात येत आहे. स्वार परिसरातील गद्दी नागली गावात राहणारा प्रेमसिंग याचा मेहंदी नगर सुमाली येथील लक्ष्मीशी प्रेमसंबंध होता. प्रियकर बर्‍याचदा आपल्या मैत्रिणीला भेटायचा. शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास हा तरुण आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकर प्रेयसीच्या घरी पोहोचला. मुलीच्या घरच्यांना तो आल्याची चाहूल लागताच त्यांनी त्या प्रियकराला पकडलं. यानंतर त्याला मारहाण करण्यात आली. याबाबत अतिरिक्त पोलिस अधीक्षक अरुणकुमार सिंग म्हणाले की, तक्रार येताच मुलाला पोलिस ठाण्यात बोलविण्यात आलं. मुलाच्या कुटुंबातील लोकही आलं. यानंतर, मुलीच्या बाजूनं आणि मुलाच्या बाजूच्या लोकांनी दोघांचं लग्न ठरविलं. यानंतर त्यांचं लग्न अझिमनगर भागातील एका छोट्या मंदिरात झाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version