देश अडचणीत असताना मोदी स्वतःची प्रतिमा घडवण्यात मग्न: राहुल गांधी

नवी दिल्ली, दि. २३ जुलै २०२०: भारत आणि चीनच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी म्हणाले,”देश अडचणीत असताना पंतप्रधान मोदी यांनी स्वतःची प्रतिमा तयार करण्यावर १०० टक्के लक्ष केंद्रित केलं आहे. भारतातील सर्व संस्था सध्या तेच काम करण्यात व्यस्त आहेत. एका माणसाची प्रतिमा राष्ट्रीय दृष्टीकोनाला पर्याय असू शकत नाही” अस म्हणत राहुल गांधी यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटर वर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडिओ मध्ये त्यांनी म्हटंल आहे. ” मजबूत स्तिथी मध्ये राहून चीनशी चर्चा करत असला, तरच तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकता. चीनने जर तुमचा कमकुवतपणा पकडला, तर अडचण आहे. चीनचा विषय हाताळण्यासाठी तुमच्याकडे दृष्टीकोन असला पाहिजे. भारताला जागतिक दृष्टिकोनाची गरज आहे.” असे ट्विट करत राहुल गांधी यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे.

प्रतिनिधी: अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा