मुंबई, १८ ऑगस्ट २०२२: दुतगती महामार्गावर नॅशनल पार्क येथील पुलावर बुधवारी डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली आहे. या अपघातात नाझीर शाह आणि त्यांची पत्नी छाया यांचा जागीच मृत्यु झाला आहे.
रस्त्त्यावर बरेच खड्डे पडल्याने खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात ते दोघीही खाली पडल्यानं मागून येणाऱ्या डंपरच्या चाकाखाली आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाझीर आणि छाया नायगाव येथे शुटिंगसाठी निघाले होते. नाझीर हे रिऍलिटी शोमध्ये क्रिएटीव्ह विभागात काम पाहत होते.
तर छाया या मेकअप आटिस्ट म्हणून काम करत होत्या. त्या दोघांचे सात वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तर त्यांना एक सहा वर्षाचा मुलगा आहे. पोलिसांनी धडक देणाऱ्या डंपरसह चालक सलीम शेख याला ताब्यात घेतले आहे.
कोणाच्या चुकीमुळे हा अपघात झाला आहे आणि सीसीटीव्ही फूटेज तसेच प्रत्यक्ष दर्शिकडून याबाबत माहिती घेण्यात येत आहे. या अपघाताला रस्त्त्यावरचे खड्डे जबाबदार असल्याचा आरोप येथील स्थानिक नागरीकांनी केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर