कोण वजीर , कोण प्यादं आणि कोण विरोधी पक्ष नेता ….

मुंबई, 5 जुलै 2022: फडणवीस हे उत्तम खेळाडू आहेत, हे तर आता स्पष्ट झालं. पण आता फडणवीस हे खोचक विधानांसाठी तेवढेच प्रसिद्ध आहेत. हे ही दिसून आलं. याचं उत्तम उदाहरण अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पहायला मिळालं.

अजितदादा पवार यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली खरी, पण त्यांना शुभेच्छा देताना फडणवीस म्हणाले की, तुम्ही विरोधी पक्ष नेते पदावर कायमचं रहावं असं मला अजिबात वाटत नाही. तसेच त्यांनी या पदाला योग्य न्याय द्यावा, असं वक्तव्य त्यांनी केलं.

पण यातून त्यांना काय सुचवायचं होतं, हा प्रश्न यामुळे उपस्थित होतो. मागच्या वेळी जेव्हा अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यावेळी राष्ट्रवादीची मतं जास्त होती. पण तेव्हाही त्यांना मुख्यमंत्री पदाने हुलकावणी दिली. असंही फडणवीसांनी नमूद केलं. त्यामुळं फडणवीसांच्या मनात नक्की काय सुरु आहे, याचा थांगपत्ता लागणं सध्या तरी अवघड आहे.

सध्या परिस्थितीत फडणवीस कोणाला काय बोलतील, याचा नेम नाही. आधीच दुखावलेलं मन आणि त्यातून उपमुख्यमंत्री पद अशा कात्रीत सापडलेले फडणवीस पुढे काय चाल खेळणार, हे तर पहावं लागेलच. पण मुख्यमंत्री हा वजीर आहे की प्यादं हे फडणवीस ठरवतील की काय? हे ही या निमित्ताने समजंल.

न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा