कोण आहेत Ilker Ayci ज्यांना बनवलं एअर इंडियाचे प्रमुख

Ilker Ayci Profile, 15 फेब्रुवारी 2022: तुर्की एअरलाइन्सचे माजी अध्यक्ष इल्कर आयसी यांची एअर इंडियाचे नवीन एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. टाटा सन्सने एअर इंडियाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ही नियुक्ती केलीय. कंपनीच्या संचालक मंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यातय. टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन हे देखील ‘विशेष निमंत्रित’ म्हणून बैठकीला उपस्थित होते. या नियुक्तीला नियामक मान्यता मिळणं बाकी असल्याचं कंपनीने म्हटलंय.

कोण आहे इल्कर आयची

आयची हे तुर्की एअरलाइन्सचे अध्यक्ष आणि बोर्ड सदस्य आहेत. इस्तंबूलमध्ये 1971 मध्ये जन्मलेले, आयची हे बिल्केंट विद्यापीठाच्या राजकीय प्रशासन विभागाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी 1997 मध्ये इस्तंबूलमधील मारमारा विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला.

आयची 1 एप्रिलपासून स्वीकारणार नवीन कार्यभार

Aichi (Ilker Ayci) 1 एप्रिलपासून एअर इंडियाचे नवीन CEO आणि MD म्हणून पदभार स्वीकारतील. आयची यांनी एअर इंडियाला ‘आयकॉनिक एअरलाइन’ म्हटले आहे. आयची यांच्या मते, टाटा समूहात सामील होणे आणि विमान कंपनीचं नेतृत्व करणे ही त्यांच्यासाठी सन्मानाची बाब असंल. आयची म्हणाले, “एअर इंडियामधील माझ्या सहकाऱ्यांसोबत आणि टाटा समूहाच्या सर्वोच्च नेतृत्वाशी जवळून काम करत आहे. आम्ही एअर इंडियाच्या वारशाचा उपयोग करून ती जगातील सर्वोत्तम एअरलाइन बनवू. जे भारताचा उबदारपणा आणि आदरातिथ्य दर्शवते.”

टाटा सन्सच्या अध्यक्षांनी म्हटली होती ही विशिष्ट बाब

एन चंद्रशेखरन म्हणाले, “इल्कर (आयची) हे विमान वाहतूक उद्योगाचे नेते आहेत ज्यांनी त्यांच्या कार्यकाळात तुर्की एअरलाइन्सला सध्याच्या यशापर्यंत नेलं आहे. टाटा समूहामध्ये इल्कर यांचं स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे, जेथे ते एअर इंडियाला एका नवीन युगात नेतील.”

एअर इंडिया आता टाटा सन्सच्या ताब्यात

टाटा समूहाने 27 जानेवारी रोजी एअरलाइन्सची कमान हाती घेतली. DIPAM सचिवांनी जाहीर केले होते की Talace एअर इंडियाचे नवीन मालक असतील आणि सरकारकडून 2,700 कोटी रुपयांची संपूर्ण रक्कम प्राप्त झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा