गोल पोस्ट राष्ट्रीय WHO च्या नकाशात PAK आणि चीनचा भाग दाखवला जम्मू-काश्मीर, TMC खासदाराने PM...

WHO च्या नकाशात PAK आणि चीनचा भाग दाखवला जम्मू-काश्मीर, TMC खासदाराने PM मोदींना लिहिलं पत्र

नवी दिल्ली, 31 जानेवारी 2022: तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार डॉ शंतनू सेन यांनी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जम्मू आणि काश्मीरला पाकिस्तान आणि चीनचा भाग म्हणून दाखविल्याबद्दल तीव्र आक्षेप घेतलाय. डॉ.सेन यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर याला तीव्र विरोध करण्याची मागणी केलीय.

याकडं पंतप्रधानांचं लक्ष वेधून त्यांनी लिहिलं की, मला तुमच्या लक्षात आणून द्यायचं आहे की, कोविडची जागतिक स्थिती जाणून घेण्यासाठी मी WHO वेबसाइटवर गेलो तेव्हा मी नकाशा बघितला.

डॉ सेन यांनी पुढं लिहिलंय की, जेव्हा मी झूम करून ते पाहिलं तेव्हा मला धक्का बसला, जम्मू आणि काश्मीर दोन वेगवेगळ्या रंगात दाखवले आहे. जेव्हा मी भारताच्या निळ्या भागानंतर दुसऱ्या भागात क्लिक केलं तेव्हा त्यात पाकिस्तानची कोरोना स्थिती दिसू लागली, तर दुसऱ्या भागात चीनची आकृती दिसू लागली.

त्यांनी पुढं लिहिलं की त्या नकाशात अरुणाचल प्रदेश देखील भारतापासून वेगळा दाखवण्यात आलाय. डॉ. सेन यांनी पुढं लिहिलं की, मला विश्वास आहे की ही एक गंभीर आंतरराष्ट्रीय बाब आहे आणि आमच्या सरकारने त्याची चौकशी करून त्यावर वेळेपूर्वी कारवाई केली पाहिजे.

तृणमूल खासदारानं आपल्या पत्रात म्हटलंय की, ते ताबडतोब दुरुस्त केलं पाहिजं आणि देशातील जनतेनं एवढी मोठी चूक कशी होऊ शकते हे विचारलं पाहिजे. इतर आंतरराष्ट्रीय मुद्द्यांप्रमाणेच आपल्या सरकारनेही तो जोमानं मांडला पाहिजे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version