नवी दिल्ली, दि.१९ ऑगस्ट २०२०: सुशांतसिंग राजपूत याचा मृत्यू होवून २ महिने उलटले आहेत. परंतू आतापर्यंत या प्रकरणाची चौकशी कोण करणार, यावर सर्व प्रक्रिया थांबली आहे. कोणत्या कारणामुळे सुशांतने आत्महत्या केली याबाबत अद्याप कोणतेही सत्य समोर आलेले नाही. बुधवारी सुप्रीम कोर्ट निर्णय देईल त्यानंतर निश्चित केले जाईल की सुशांत प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे जाईल की मुंबई पोलिसांकडे जाईल.
आज सुशांत प्रकरणातील महत्त्वपूर्ण सुनावणी
आज सकाळी ११ वाजता सर्वोच्च न्यायालय रिया चक्रवर्ती हिच्या याचिकेवर निर्णय देईल. न्यायमूर्ती हृषिकेश राय यांचे एकल न्यायाधीश खंडपीठ हा निकाल देतील. रियाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती की, बिहारमधील तिच्यावरील खटला मुंबईत वर्ग करावा. सुशांतच्या वडिलांनी रियाविरोधात पटण्यातील राजीव नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. रियाने सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप के के सिंह यांनी केला आहे.
सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर ईडी आणि सीबीआय या प्रकरणाच्या चौकशीत गुंतले आहेत. ईडी आणि सीबीआयने या प्रकरणाशी संबंधित अनेक लोकांची चौकशी केली आहे. देशातील लोक, चित्रपट-टीव्ही स्टार्स सुशांत प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत आहेत. सुशांतचे कुटुंबीय आणि त्यांचे निकटवर्तीय यांना या प्रकरणाच्या निष्पक्षतेसाठी सीबीआय चौकशी हवी आहे.
सुशांत प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गेल्या मंगळवारी रिया चक्रवर्ती यांच्या याचिकेवर निकाल राखून ठेवला. सुनावणीदरम्यान, बिहार सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील मनिंदर सिंह, महाराष्ट्र सरकारच्या वतीने ए.एम. सिंघवी, श्याम दिवान रियाच्या बाजूने आणि विकाससिंग सुशांत सिंह यांच्या परिवाराच्या बाजूने. सर्व पक्षांनी त्यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात लेखी उत्तर सादर केले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी