संपूर्ण गाव सील करून गावाची हत्या करावी: महंत नरेंद्रगिरी महाराज

नाशिक : पालघरमधील साधू हत्या प्रकरण चांगलेच तापायाला सुरुवात झाली आहे. देशातील सर्व स्तरातील लोक या मैदानात उतरले आहे. ‘महाराष्ट्रातील संत असुरक्षित आहेत. सरकार आरोपींना पाठीशी घालत आहे. या हत्याकांडात पोलीस देखील जबाबदार आहेत. संपूर्ण गावाला सील करून गावाची हत्या करावी,’ अशी संतप्त प्रतिक्रिया अखिल भारतीय आखाडा परिषद अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांनी दिली आहे.

‘महंतांची हत्या करणारे राक्षसच म्हणावे लागतील. त्यामुळे त्यांचा वध करण चुकीचं नाही. लॉकडाऊननंतर लाखो नागा साधूंना घेऊन त्या गावाला आणि सरकारला घेरण्यात येणार आहे. यामुळे देशातील सर्व आखाड्यांचे महंत संतप्त झाले आहेत. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास सरकारच्या विरोधात मोठं आंदोलन उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले महाराष्ट्र ही संतांची भूमी मानली जाते. मात्र आता महाराष्ट्रात साधू संत सुरक्षित नाही,’ अशा आक्रमक शब्दांमध्ये महंतांनी आपल्या मनातील नाराजी व्यक्त केली आहे.

नेमकं घडलं काय?
पालघरमधील दाभाडी-खानवेल मार्गावर नाशिककडून येणाऱ्या एका वाहनाला ग्रामस्थांनी रोखलं होतं. या प्रवाशांची विचारपूस पूर्ण ऐकून घेण्याच्या आतच ग्रामस्थांनी दगडफेक करायला सुरुवात केली. या मारहाणीमध्ये चालकासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसंच पोलिसांचा मोठा फौजफाटा पोहोचला होता. संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक केली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा