मुंबई, १० जुलै २०२३ : कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे अशी सध्याच्या सरकारची परिस्थिती असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांचा आज विदर्भ दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. अमरावती येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, पुर्वी सरकार मतपेटीतून येत होतं, आता सरकार खोक्यातून जन्माला येत आहे.
मतदान कोणालाही केलं तरी सरकार माझंच येणार असा पायंडा पडला तर दमदाटी करुन कोणीही देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. त्यामुळे ‘राईट टू रिकॉल’ म्हणजेच लोकप्रतिनिधींनी जर चुक केली असेल तर त्याला परत बोलण्याचा अधिकार द्यायला पाहिजे का? याच्यावर आता देशात विचार व्हायला पाहिजे, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे.
शिवसेना हे नाव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले आहे. निवडणूक आयोग पक्षाच चिन्ह देवू शकतो पण नाव देवू शकत नाही. मी माझ्या पक्षाच नाव दुसऱ्याला देणार नाही. असा इशारा त्यांनी दिला आहे. मी रुग्णालयात असताना रात्रीच्या गाठीभेटी सुरू होत्या, तेव्हा पूजापाठ कोण करत होतं ते त्यांना विचारा, माझ मुख्यमंत्री होणं अनपेक्षित होतं, तस कोणतेही माझ स्वप्न नव्हते, शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचा माझा निश्चय आजही आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर